‘निसर्ग सोबती’तर्फे  येत्या २० ते २८ जुलै दरम्यान केनिया सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. यात साम्बुरू, नैवाशा, नकरू आणि मसाई मारा आदी ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत. बिबटय़ा हिप्पो, जिराफ, ठिपकेवाला तरस, हत्ती आदी सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २०० हून अधिक पक्षी पाहण्याची संधी या जंगल सफारीमध्ये मिळणार आहे. संपर्क – ९९३०५६१६६७, ९८१९३३०२२२
एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धा
नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे (एनईएफ) ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात अखिल भारतीय स्तरावर साहसी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पानशेत-खडकवासला-सिंहगड परिसरातील डोंगराळ भागात होणार आहे. या स्पर्धेत सव्वाशे किलोमीटर सायकलिंग व सव्वाशे किलोमीटर ट्रेकिंगचा समावेश आहे. त्याखेरीज स्पर्धकांना दहा किलोमीटरचे कयाकिंगही करावे लागणार आहे. स्पर्धकांना पदभ्रमणाच्या मार्गात रॅपलिंग करण्याची संधी मिळणार असून दोरीवरून नदी ओलांडण्याचा टप्पाही त्यामध्ये समाविष्ट आहे. ही स्पर्धा सांघिक स्वरूपाची असून प्रत्येक संघात किमान एक महिला खेळाडू असणे अनिवार्य आहे. या स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. स्पर्धेसाठी खुला गट, हौशी खेळाडू, महाविद्यालयीन खेळाडू असे विविध गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी दहा लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन, पुरंदरे बिल्डिंग, पर्वती पायथा, पुणे येथे अपूर्वा जडये (८१४९१६०४९९) किंवा ईशा कुमठेकर (९७६७९४९४३९) यांच्याकडे संपर्क साधावा.
अलंग, मदन, कुलंग मोहीम
‘एक्सप्लोर्स’तर्फे येत्या २५ ते २७ जानेवारी दरम्यान अलंग, मदन, कुलंग मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद केंजळे (९८५०५०२७२३) यांच्याशी संपर्क साधावा.
जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प
उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी स्थित असलेल्या जिम कॉर्बेट व्याग्र प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. या अरण्याला १९३५ सालीच संरक्षित अरण्याचा दर्जा देण्यात आला. पुढे १९७३ साली भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प देखील याच जंगलात साकारला.  १३१८ चौरस किलोमीटर एवढे प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघ, हत्ती, बिबळे, अस्वल पाहण्यास मिळतात. पक्षीनिरीक्षकांसाठी हे अरण्य तर स्वर्गच आहे. ५८० पेक्षाही अधिक जातीचे पक्षी येथे आढळतात. अशा या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पामध्ये १९ ते २४ मेच्या दरम्यान ‘निसर्ग भ्रमंती’च्या वतीने जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७, ६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘व्हाईट वॉटर’ राफ्टिंग
ऋषिकेश, उत्तराखंड येथे गंगेच्या पात्रात ‘राफ्टिंग’चे येत्या २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान आयोजन करण्या आले आहे. या साहसी क्रीडाप्रकारात १४ वर्षांवरील व्यक्तीस प्रवेश देण्यात येईल.
भरतपूर पक्षिनिरीक्षण सहल
ट्विन आऊटडोअरतर्फे २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्यामध्ये सहल आयोजित करण्यात आली आहे. भरतपूर विविध प्रकारच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या सहलीमध्ये पेलिकॅन्स, फ्लेमिंगो, स्पूनबिल असे अनेक पक्षी पाहायची संधी पर्यटकांना मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क आर्चिस सहस्रबुद्धे – ९८९२१७२४६७, विद्यानंद जोशी – ९८३३४६४०३३.