‘एव्हरेस्ट बेस कॅम्प – चो ला पास-गोकयो ’ हा जगातील सर्व भटक्यांचे स्वप्न असलेला ट्रेक. एव्हरेस्ट चढता नाही आले, तरी आयुष्यात एकदा तरी या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडावे ही तमाम गिरिप्रेमींची इच्छा असते. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकमध्ये ही इच्छा पूर्ण होते. तसेच या ट्रेकमधून या सर्वोच्च शिखराच्या सान्निध्यात पदभ्रमंतीचा आनंदही मिळतो. एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या या पदभ्रमण मोहिमेत विविध हिमशिखरांचे दर्शन घडते. हिमालयाची जवळून अनुभूती, उंचीवरील पदभ्रमण मोहिमेचा अनुभव गाठीशी येतो. या पदभ्रमणामध्येच जगप्रसिद्ध सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाचेही दर्शन घडते. अशा या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २५ एप्रिल ते १६ मे २०१६ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
रणथंबोर सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा भ्रमंती
ताडोहा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘वसुंधरा’तर्फे आयोजन केले आहे. २० ते २६ जानेवारी २०१६ या कालावधीत जाणाऱ्या या सहलीमध्ये आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ आणि पवनार आदी प्रकल्पांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.