ट्रेक डायरी
चिलिका हे भारतातील सर्वात मोठे मिश्र पाण्याचे सरोवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन आहे. २१६ पक्षी प्रजातींची इथे नोंद झाली आहे. विविध प्रकारची बदकं, थोरला रोहित, थोरला झोळीवाला, समुद्री गरुड, विविध खंडय़ा, तिरंदाज, धाकटा रोहित, काळ्या डोक्याची शराटी, काळ्या पोटाचा सुरय, डाल्मेशियन झोळीवाला व पांढऱ्या पिसांचं गिधाड असे पक्षी इथे दिसतात. त्याशिवाय दुर्मिळ इरावती डॉल्फिन व बॉटल – नोज डॉल्फिन सुद्धा दिसतात. अशा या चिलिका सरोवर परिसरात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने भटकंतीचे २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
जंगल सफारी
एप्रिल-मे महिना हा जंगल भ्रमंतीसाठी उत्तम मानला जातो. वानर-चितळांपासून ते वाघांपर्यंत आणि सरपटणाऱ्या जिवांपासून विविध जातीच्या पक्ष्यांपर्यंत अनेक वन्य जिवांचे दर्शन या दोन महिन्यात मोठय़ा संख्येने होते. ही वन्यजीवसृष्टी पाहण्यासाठीच निसर्ग सोबतीच्या वतीने ताडोबा, रणथंबोर, कान्हा, बांधवगड आणि जिम कॉर्बेट येथील जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७, ६८) यांच्याशी संपर्क साधावा.
मल्हारगड संवर्धन मोहीम
पुण्यातील ‘व्हिन्सीस’ या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या अभियंत्यांनी नुकतीच पुण्याजवळच्या मल्हारगडावर संवर्धन मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत कंपनीच्या ५० हून अधिक अभियंत्यांनी या गडाची साफसफाई, मार्गदर्शक फलक लावणे, ध्वजस्तंभ उभारणी, मंदिर वा अन्य वास्तूंची डागडुजी आदी उपक्रम पार पाडले. कंपनीच्या या अभियंत्याच्या वतीने भविष्यातही या गडावर साफसफाई आणि जतनासाठी कार्य केले जाणार आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
in wardha Water Crisis Hits Bor Sanctuary
वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम