महाराष्ट्रातील साडेतीनशे दुर्गाविषयी आपण साऱ्यांनीच ऐकलेले आहे. मात्र मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे? मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे येत्या २६ जानेवारी रोजी  मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफ रीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा  निलाक्षी पाटील  (९८१९१०६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

जंगल सफारींचे आयोजन
tr02‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे विविध जंगल सफारींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पेंच (२५  ते ३० मार्च आणि १ ते ६ जून), रणथंबोर (२५ ते ३० मे), कान्हा (२१ ते २६ मे), बांधवगड (१४ ते १९ मे) आदी जंगलांना भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३५०२६१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

नांदूर मधमेश्वर भ्रमंती
पर्यावरण दक्षता मंचातर्फे नांदूर मधमेश्वर अभयारण्यात २४ आणि २५ जानेवारी भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या भ्रमंतीमध्ये तज्ज्ञांच्या मदतीने वन्यजीवांची ओळख करून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अविनाश भगत (९८९२०६१८९९) यांच्याशी संपर्क साधावा.

रणथंबोर सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे १२ ते १५ एप्रिल दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com