बांधवगड दर्शन
‘आसमंत’ संस्थेतर्फे येत्या ६ ते ९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. सध्या व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या या ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष भिडे (९९३०६६०७३१) यांच्याशी संपर्क साधावा.

‘डय़ूक्स नोज’वर रॅपलिंग
‘हाय टेक अॅडव्हेंचर’तर्फे २६ जानेवारी रोजी ‘डय़ूक्स नोज’ कडय़ावर ‘फ्लाइंग फॉक्स’ पद्धतीच्या साहस उपक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी तुषार मोडक (९६१९१४४८४७, ९८९२२२५६१५) यांच्याशी संपर्क साधावा.

रणथंबोर जंगल सफारी
ट्वाइन आऊटडोअर्सतर्फे १८ ते २० एप्रिल दरम्यान राजस्थानमध्ये रणथंबोर व्याघ्रप्रकल्प येथे जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. रणथंबोरचे अभयारण्य भारतामधील अतिशय प्रसिद्ध जंगल आहे. येथे वाघ, बिबटय़ा, तरस, रानकुत्रे, सांबर, चितळ, चोिशगा असे विविध प्रकारचे प्राणी पाहता येतील. रणथंबोरमध्ये २०० हून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे. जंगल सफारी दरम्यान, सर्पगरुड, हळद्या, घुबड, मुनिया, बगळे असे विविध पक्षी पाहण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क अर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा अदिती रानडे ९८२०८४४६६७. संकेतस्थळ – ँ३३स्र्://६६६.३६्रल्ली४३१ि२.ूे
अंधांसाठी गिरीभ्रमण
‘कल्पविहार अडव्हेंचर्स’ या गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने दादर येथील कमला मेहता अंधशाळेतील विद्यार्थीनींसाठी किल्ले रायगडावर गिरीभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आह़े  विशेष म्हणजे या वेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यास आप्पा परब मार्गदर्शन करणार आहेत़  १ आणि २ फेब्रुवारी २०१४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी उत्साही स्वयंसेवकांची आवश्यकता आह़े  तरी इच्छुकांनी ९८२०६८४७२३ या क्रमांकावर संपर्क साधावा़

माणिकगड मोहीम
‘एसपीआर हायकर्स’ तर्फे रविवार, १९ जानेवारी रोजी माणिकगड मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६), राजेंद्र (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.
अलंग, मदन आणि कुलंग गड मोहीम
‘कल्पविहार अॅडव्हेंचर्स’ या गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने १८ ते १९ जानेवारी रोजी अलंग, मदन आणि कुलंग गडाच्या मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी वैशाली देसाई (९८२०६८४७२३) यांच्याशी संपर्क करा.
केंजळगड पदभ्रमण
‘माऊंटन हायकर्स’ तर्फे १९ जानेवारी रोजी केंजळगड पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८), वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.