‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक
‘एव्हरेस्ट बेस कॅम्प – चो ला पास-गोकयो ’ हा जगातील सर्व भटक्यांचे स्वप्न असलेला ट्रेक. एव्हरेस्ट चढता नाही आले, तरी आयुष्यात एकदा तरी या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडावे ही तमाम गिरिप्रेमींची इच्छा असते. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकमध्ये ही इच्छा पूर्ण होते. तसेच या ट्रेकमधून या सर्वोच्च शिखराच्या सान्निध्यात पदभ्रमंतीचा आनंदही मिळतो. एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या या पदभ्रमण मोहिमेत विविध हिमशिखरांचे दर्शन घडते. हिमालयाची जवळून अनुभूती, उंचीवरील पदभ्रमण मोहिमेचा अनुभव गाठीशी येतो. या पदभ्रमणामध्येच जगप्रसिद्ध सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाचेही दर्शन घडते. अशा या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २५ एप्रिल ते १६ मे २०१६ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

उजनी पक्षी निरीक्षण सहल
‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या १६ ते १७ जानेवारी २०१६ रोजी उजनी धरणक्षेत्रातील कुंभारगाव येथे पक्षी निरीक्षण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी जलाशयावर विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येतात. रोहीत, चित्रबलाक, पाणकावळे, विविध प्रजातींची बदकांची उपस्थिती यामध्ये लक्षणीय असते. या पक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास आणि छायाचित्रण करण्यासाठी ‘हिरवाई’तर्फे या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अलंग, मदनची चढाई
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अलंग मदन आणि कुलंग या गडकोटांची पदभ्रमण मोहीम आयोजित केली आहे. हे दुर्ग सह्य़ाद्रीचे रोद्र रूप धारण केलेले आहेत. यांच्या वाटा भटक्यांना नित्य आव्हान देणाऱ्या असतात. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी, लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com

‘कुवारी पास’ मोहीम
‘एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या २४ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ दरम्यान हिमालयातील ‘कुवारी पास’ मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.