शिवरायांनी बांधलेल्या अनेक जलदुर्गावर दुर्गप्रेमींची पावले सतत उमटत असतात. या जलदुर्गाच्या माळेतीलच खांदेरी व उंदेरी मात्र परवानगीअभावी आजवर त्यांच्यापासून दूर राहत होता. पण आता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाभ्रमण योजनेखाली ‘जिद्द’ मासिकाद्वारे तेथे जाणे शक्य झाले आहे. खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते. या बेटावर १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले दीपगृह आहे. लोखंडाचा आवाज करणारा एक दगड आहे. गडावर महादेव, एकवीरा, गणपती, मारुती, बुद्धविहार, क्रूस अशी अलीकडे बांधलेली धर्मस्थळे आहेत. गडावर काही तोफा आहेत. उंदेरी किल्ल्याचा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत असून धक्क्य़ाच्या जवळच एक छोटेसे लेणे आहे. अशा या दोन्ही जलदुर्गावर भ्रमंतीचा बेत पनवेलच्या जिद्द आणि पुण्याच्या मैत्रयी ट्रेकिंग क्लबने रविवार १६ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी सुनील राज, पनवेल (९८६९३३१६१७)  यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड पदभ्रमण
हिंदवी परिवारातर्फे कळसुबाई हरिश्चंद्रगड रतनगड पदभ्रमंती मोहिमेचे ४ ते ६ जानेवारी २०१३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -अभिजित भडंगे ९०११०१४३९९.
ताडोबा जंगल सफारी
निसर्ग टूर्सतर्फे येत्या २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
रायगड प्रदक्षिणा
हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘किल्ले रायगड प्रदक्षिणे’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ३० डिसेंबर या दिवशी हा उपक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी २९ नोव्हेंबर या दिवशी पाचाड गावातील धर्मशाळेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जमणे आवश्यक आहे. संपर्क- समीर कदम- ९९२०० १८४९१, किरण शेलार- ९८३३७ ०६६७२
दुर्गनिबंध स्पर्धेचे आयोजन
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणारे दुर्ग साहित्य संमेलन यंदा २६ ते २८ जानेवारी २०१३ रोजी विजयदुर्गवर आयोजित केले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. १) जलदुर्गाचे महत्त्व : काल, आज, उद्या २) शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ३) जलदुर्गावरील निसर्ग आणि पर्यावरण, त्याचे महत्त्व ४) विजयदुर्गचे सामरिक महत्त्व ५) मराठय़ांचे आरमार. दोन हजार शब्दांपर्यंत लिहिलेले हे संशोधनपर निबंध १० जानेवारी २०१३ पर्यंत डॉ. विजय देव, सी-४०१, पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे- ४११००९ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव ( ९८२२४०१७५३) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेतील निबंधविजेत्यांचा संमेलनात गौरव करण्यात येईल.