24 September 2017

News Flash

बापानं ५००००० रुपयांसाठी अल्पवयीन मुलीचं लग्न वृद्धाशी लावलं

लालसेपोटी आपल्या मुलीला शेखच्या स्वाधीन केलं

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 17, 2017 1:58 PM

मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांना देखील पैशाची लाच दाखवत त्यांची तोंडं बंद केली.

एका बापानं केवळ काही रुपयांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न ६५ वर्षांच्या ओमानमधील वृद्धाशी लावून दिलंय. पीडित मुलीच्या आईनं पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. पीडित मुलगी ही हैदराबादमधील असून, ती सोळा वर्षांची आहे. तिच्या वडिलांनी आणि आत्यानी मिळून तिचं लग्न वृद्धाशी लावून दिल्याचा आरोप तिची आई सईदा उन्नीसा यांनी केला आहे.

ओमानचे नागरिक असलेले शेख अहमद लग्नासाठी हैदराबादमध्ये आले होते. ते लग्नासाठी मुलगी शोधत होते. यावेळी त्यांची पीडित मुलीच्या वडिलांशी ओळख झाली आणि यानंतर तिच्या वडिलांनी काही रुपयांच्या लालसेपोटी आपल्या मुलीला शेखच्या स्वाधीन केलं. या व्यवहारात मुलीची आत्याही सहभागी असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांना देखील पैशाची लाच दाखवत त्यांची तोंडं बंद केली. त्यानंतर लगेचच एक हॉटेलमध्ये यांचा निकाह पार पडला, अशी माहिती सईदा यांनी पोलिसांना दिली.

निकाह होताच हा इसम मुलीला घेऊन मस्कतमध्ये फरार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

First Published on August 17, 2017 1:58 pm

Web Title: 16 year old hyderabad girl married to elderly sheikh oman for a payment of rs 5 lakh
 1. A
  Ameya
  Aug 17, 2017 at 6:21 pm
  यात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. १. त्या आईने हे सर्व घडत असताना तक्रार का नाही केली. २. जर मुलगी १८ वर्षांची नसेल तर तिचा पासपोर्ट बनवताना काहीच अडचणी आल्या नाहीत? कारण परदेशात नोकरीचे कारण जरी दाखवले तरी वय निदान १८ असावे लागते. ३. एखाद्याची पत्नी म्हणून पासपोर्ट काढायचा तर १६ वर्षे हे वय ग्राह्य धरता येणार नाही, मग विजा कसा मिळाला. चौकशी करायची तर ती हैद्राबादच्या पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची देखील केली पाहिजे, कारण वाम मार्गाचा अवलंब केल्याशिवाय हे होणे शक्य नव्हते. त्यात पुन्हा मुस्लिम जनतेचा मसीहा, खुद्द ओवेसी हैदराबादचा असताना त्या आईने मदत का नाही मागितली? तिला बहुतेक कळून चुकले असावे कि खरी मदत जर कुणी करू शकेल तर ती व्यक्ती सुषमा स्वराजच आहेत. अशा अनेक मुली गाई मार्गांचा अवलंब करून आखाती देशात पाठवल्या जातात, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सामान नागरी कायदाच हवा
  Reply
  1. V
   Viren Narkar
   Aug 17, 2017 at 2:43 pm
   ह्या नीच कृत्यात खूप जण गुंतलेले असणार. तिला पासपोर्ट कसा मिळाला? १६ वर्षांची मुलगी नाबालिक समजली जाते. मग तिने कोणत्या नावाने आणि कोणत्या पासपोर्टवर प्रवास केला? निकाह लावणाऱ्याने हे काम नक्कीच खूप पैसे घेऊन केले असणार. सर्वांच्या मुसक्या बांधा. जर ती मुलगी ओमानला गेली असेल तर नीचे आयुष्य आता संपलेले आहे. तिच्या आईने ताबडतोब तक्रार का केली नाही? तिच्या हिश्श्याचे पैसे मिळाले नाही म्हणून? ह्याकरता मुस्लिम पर्सनल कायद्यात खूप बदल होणे आवश्यक आहेत. त्या बिच्चाऱ्या मुलीचे आयुष्य बरबाद करून टाकले ह्या सर्व नीच लोकांनी.
   Reply