भारत हा विविधतेने नटलेला देश असून अनेक देशांतील लोकांना भारताचे हेच वैशिष्ट्य आकर्षित करते. इथली माणसं, त्यांचे राहाणीमान, संस्कृती, वेशभूषा, खाण्या-पीण्याच्या सवयींबरोबरच अनेक क्षेत्रातील वैविध्यता जवळून अनुभण्यासाठी जगभरातून अनेकजण भारत भेटीवर येतात. कला आणि मनोरंजन क्षेत्रदेखील सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात बॉलिवूड तर सर्वांच्याच आकर्षणाचा विषय.

जोहन बरटोली आणि हॅमपुस बर्गक्विस्ट हे असेच दोन विदेशी तरुण, सध्या ते इंटरनेटच्या महाजालावर चर्चेचा विषय ठरले आहेत. भारत आणि बॉलिवूडचे आकर्षण असणारे हे दोघे ‘2 Foreigners in Bollywood’ या टोपण नावाने इंटरनेटवर प्रसिध्द आहेत. मूळ स्विडनचे असलेले हे तरुण पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये स्थायिक होण्यासाठी या मायानगरीत दाखल झाले. व्यावसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले हे दोघे बॉलिवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी आले, परंतु त्यांचे सोशल मीडीयावरील व्हिडिओ आणि पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील दैनंदीन आयुष्यासोबतच इतर गोष्टीदेखील खुसखुशीतपणे मांडल्या आहेत.

Amit shah on ucc
“देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न, म्हणाले, “अनेक मुस्लिम देश…”
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी
Arvind Kejriwal
केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

त्यांच्या पोस्टमध्ये विषय अतिशय साध्या आणि सोप्या पध्दतीने मांडण्यात आल्याने त्या बघणाऱ्याला भावतात. आणि हेच त्यांच्या वाढत्या प्रसिध्दीचे मुख्य कारण आहे. सोशल मीडियावरील एकाच स्वरुपाच्या पोस्टना कंटाळलेला युजर कायम नाविंण्याच्या शोघात असतो. त्यामुळेच त्याला या साध्या आणि सरळ पोस्ट आकर्षित करत आहेत. या दोघांनी ‘रंगुन’, ‘रुस्तम’ आणि ‘बेंजो’ चित्रपटात छेट्या भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा त्यांना ऑडिशन नसते, तेव्हा ते हलकेफुलके विनोदी व्हिडिओ शूट करतात. त्यांचे हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या फॉलोअर्समध्येदेखील वाढ होत आहे.

अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर केवळ मुंबईकरच हात दाखवून रस्ता ओलांडू शकतो… अन्य कोणी असा प्रयत्न करू नये. हे दर्शविणारा व्हिडिओ तर एकदम भन्नाट.

‘स्वच्छ भारत’ अभियानावर भाष्य करणारा त्यांचा हा व्हिडिओ पाहाणाऱ्याला अंतर्मुख करतो.

Swachh Bharat Abhiyan…

A post shared by 2 Foreigners In Bollywood (@2foreigners_in_bollywood) on


विदेशी पर्यटकाला दारू विक्री करतानाचा हा व्हिडिओ नक्कीच हसायला लावणारा असा आहे.

मुंबईतील पदपथावर कपडे विकणाऱ्याच्या भूमिकेतील त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच जमून आला आहे.

When prices are dropping, it’s time to go shopping…

A post shared by 2 Foreigners In Bollywood (@2foreigners_in_bollywood) on


पाढंरा कुर्ता आणि लेंगा परिधान करून साकारण्यात आलेला हा व्हिडिओ आणि त्यांनी दर्शविलेला अॅटिट्युड एकदम झकास.

It can be dangerous to talk shit behind a foreigner’s back…

A post shared by 2 Foreigners In Bollywood (@2foreigners_in_bollywood) on


भाडे नाकारणारा रिक्षाचालक सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. असाच एक रिक्षाचालक या व्हिडिओमध्ये साकारण्यात आला आहे.

Some autowalas can be a real pain in the ass…

A post shared by 2 Foreigners In Bollywood (@2foreigners_in_bollywood) on