शांघायमधलं शेकडो वर्षे जुनं बौद्ध मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. येथे येणाऱ्या लोकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही गर्दी अशीच कायम राहिली आणि दुर्घटना झाली तर हजारो लोकांचे हकनाक प्राण जातील. कारण मुख्य मंदिराच्या बाजूला लाकडाच्या अनेक छोट्या छोट्या इमारती आहेत, तेव्हा सुरक्षेचा उपाय म्हणून चक्क हजारो टन वजनाचं मंदिर मुख्य जागेपासून १०० फूट दूर नेऊन वसवण्यात आलंय.

वाचा : ऐकावं ते नवलच!, वय वर्ष ५८, १२० बायका आणि २८ मुलांचा करतोय सांभाळ

चीन हे नेहमीच तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा वरचढ आहे. तेव्हा तंत्रज्ञानाच्या जोरावर शांघायमधलं जेड बुद्धा मंदिर मूळ जागेपासून ३० मीटर म्हणजे जवळपास ९८ फूट लांब स्थलांतरित करण्यात आलंय. या मंदिरात दरवर्षी जवळपास १ लाखांहून अधिक भाविक येतात. मंदिरात आलेला प्रत्येक भाविक बुद्धाच्या मूर्तीसमोर उदबत्ती लावतो. पण भविष्यात यामुळे आग लागू शकते. जर अशी काही दुर्घटना झालीच तर लाखो भाविकांचा आगीत होरपळून मृत्यू होईल. तेव्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून सुरक्षेचा उपाय करत मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं.

वाचा : अबब! ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस, पाकिस्तानी ‘हल्क’चा खुराक

दररोज पाच मीटर हे मंदिर मूळ जागेपासून स्थलांतरित करण्यात आलं. दोन हजार टन वजनाची ही पुरातन इमारत आहे. या वास्तूला कोणतंही नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेत तिचं स्थलांतर करण्यात आलं. विशेष म्हणजे फक्त दोन आठवड्यात हे काम पूर्णदेखील झालं.