‘जिओ प्राईम’ मध्ये सहभागी होण्यासाठी उद्याचा (३१ मार्च) दिवस शेवटचा आहे. गेल्यावर्षी, मोठा गाजावाजा करत सुरू झालेली रिलायन्सची ‘जिओ’ सर्व्हिस आता फ्री राहणार नाही. जिओ प्राईमची मेंबरशिप वर्षाला ९९ रूपये एवढी आहे. जिओ प्राईममध्ये सहभागी झालेल्यांना जिओच्या सर्व्हिसेस कमी दरात वापरण्याची संधी असणार आहे. यामध्ये १० रूपये प्रति जीबी एवढ्या कमी रेटने इंटरनेट वापरता येणार आहे. याशिवाय ३०३ रूपयाचा प्लॅन निवडला तर आता फ्री असणारे प्लॅन्स जिओ ग्राहकांना यापुढेही मिळणार आहेत.

पण एखाद्या यूझरला जिओ प्राईम घ्यायचं नसेल तर त्या सिम कार्डचं काय होईल? जर तु्म्ही रिलायन्स जिओची मेंबरशिप घेतली नाहीत तर ३१ मार्चनंतर आतायपर्यंत फ्री असणाऱ्या आॅफर्स बंद होतील आणि ‘जिओ प्राईम’ व्यतिरिक्त वेगळे प्लॅन्स निवडावे लागतील. ‘जिओ प्राईम’च्या प्लॅन्सपेक्षा हे प्लॅन्स निश्चितच महागडे आहेत.

याशिवाय लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे ३१ मार्चनंतर तुम्ही ‘जिओ प्राईम’ किंवा जिओ प्राईम व्यतिरिक्तचे प्लॅन्स तुमच्या नंबरवर चालू करून घेतले नाहीत तर तुमची काॅल करण्याची किंवा स्वीकारण्याची सोय काही काळाने काढून घेतली जाईल.

वाचा-  मॅकडाॅनल्ड्समध्ये जाताय? चांगले पदार्थ ‘मिळवायला’ या ट्रिक्स वापरा

‘रिलायन्स प्राईम’ ही योजना ३१ मार्च २०१७ पूर्वी रिलायन्स जिओच्या सेवेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांसाठी आहे. सप्टेंबर महिन्यात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ च्या सेवेची मोठ्या धूमधडाक्यात सुरूवात केली होती. त्यानंतर अनेक महिने ‘जिओ’ची सर्व्हिस संपूर्णपणे मोफत होती. ही मोफत सेवा आता यापुढेही चालू राहणार असल्याची बऱ्याच लोकांची धारणा झाली होती. पण ३१ मार्चनंतर सगळं बदलणार आहे. जिओ प्राईम आणि जिओ प्राईम व्यतिरिक्तच्या प्लॅन्सची तुलना केली तर सध्यातरी ‘जिओ प्राईम’चे प्लॅन्स जास्त फायदेशीर आहेत असं म्हणता येईल.