भारतीय आध्यात्मिक गुरू श्री चिन्मय यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त न्यूयॉर्क शहरातील श्री चिन्मय केंद्रात ७२ हजारांहूनही अधिक मेणबत्त्या पेटवून विश्विविक्रम साधण्यात आला.

वाचा : दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम

न्यूयॉर्कमध्ये ६० च्या दशकात चिन्मय कुमार घोष म्हणजेच श्री चिन्मय यांनी आध्यात्मिक शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त १०० जणांच्या तुकडीने ७२ हजार ५८५ मेणबत्या पेटवत विश्वविक्रम साधला. विश्वविक्रम साधण्यासाठी या मेणबत्त्या ६० ब्लोटॉर्चच्या मदतीने पेटवण्यात आल्या. ८०. ५ फूट लांबीचा आणि दोन फूट रुंदीचा केकही यावेळी बनवण्यात आला होता. त्यावर या मेणबत्त्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली. या मेणबत्त्या ८० फूट लांब केकवर लावण्यात आल्या होत्या. जवळपास ४० सेंकद या मेणबत्त्या जळत होत्या. त्यानंतर अग्निशमन यंत्राच्या मदतीने या मेणबत्त्या विझवण्यात आल्या. विश्वविक्रम साधल्यानंतर केकही कापण्यात आला. याआधी एप्रिलमध्ये कॅलिफोर्नियामध्ये एकाच वेळी हजारो मेणबत्त्या पेटवण्याचा विश्वविक्रम साधला गेला. माइक्स हार्ड लेमोनेडने एकावेळी ५० हजार १५१ मेणबत्त्या पेटवून विश्वविक्रम केला होता. पण त्यांचा हा विश्वविक्रम मोडीत काढला गेला.