‘पाणी हे खूप मौल्यवान आहे’, ‘जल हे जीवन आहे’ आणि ‘जल हे अमृत आहे’, अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. खरंच पाणी हे खूप मौल्यवान आहे, जिथे वर्षांनुवर्षे पाऊसच पडत नाही अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब मोत्यासारखा आणि सोन्याहूनही मौल्यवान आहे. पण जगात काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी ‘मौल्यवान’ हा शब्द जरा जास्तच गंभीरतेने घेतला आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्या किंमतीने ते पाण्याची विक्री करतात. आता अशीच एक कंपनी भारतात लवकरच पदार्पण करणार आहे. कॉलिफोर्नियामधली ही कंपनी चक्क ६५ लाख रुपये प्रतिलिटर या दराने भारतात पाण्याची विक्री करणार आहे.

Viral Video : सोशल मीडियावर पूजाची ‘ढिंच्याक’ एण्ट्री! घेऊन आलीय नवीन गाणं

‘बेव्हर्ली हिल्स ड्रिंक’ असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी पुढील वर्षी आपलं बाटली बंद पाण्याचं उत्पादन भारतात विक्रीसाठी आणणार असल्याचे ‘इंडिया टाइम्स’ने म्हटलं आहे. पूर्णपणे शुद्ध असलेलं हे पाणी कॉलिफोर्नियाच्या पर्वतातून आणलं जाणार आहे. हे पाणी ज्या बाटलीतून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्याचीही वेगळी खासियत आहे. या बाटलीचं झाकणं हे पांढऱ्या सोन्यापासून तयार करण्यात येणार आहे त्यावर एक मोठा हिरा आणि २५० छोटे काळ्या रंगाचे हिरेही असणार आहेत.