लग्नसराईचे दिवस आहे, दरदिवशी लग्नाच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात, काही दिवसांपूर्वी जनादर्न रेड्डीच्या मुलीच्या ५०० कोटींच्या विवाह सोहळ्याची चर्चा होती. तर नोटाबंदीमुळे सुरत आणि कर्नाटकमधल्या जोडप्यांच्या लग्नाची गोष्टही व्हायरल झाली होती. नोटाबंदीमुळे या दोन्ही जोडप्यांनी फक्त ५०० रुपयांत आपला विवाह सोहळा आटोपला होता. अशातच आता चर्चा आहे ती नवरदेवाविना पार पाडलेल्या ऑनलाईन विवाह सोहळ्याची.

वाचा :  लग्न करण्याआधी जोडीदारासोबत ‘या’ गोष्टींबाबत नक्कीच चर्चा करा

ऑफिसच्या कामामुळे सुट्टी मिळत नसल्याने या नवरदेवाला लग्नाला काही उपस्थित राहता आहे नाही. त्यामुळे नव-याच्या गैरहजेरीत अगदी धुमधडाक्यात केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यात हा विवाह सोहळा पार पडला. हॅरिस हे सौदी अरेबियातल्या एका खासगी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतात. पण, काही कामांमुळे त्यांना लग्नासाठी देखील सुट्टी मिळेना. त्यांना लग्नासाठी भारतात परतायचे होते, पण सुट्टी मिळत नसल्याने त्यांना सौदीत थांबावे लागले. केरळमधल्या व्यवसायाने नर्स असलेल्या शामला यांच्याशी त्यांचा विवाह ठरला. परंतु हॅरिस भारतात उपस्थित राहु न शकल्यामुळे त्यांच्या बहिणीने लग्नाला उपस्थिती लावून हॅरिसच्या वतीने सा-या विवाहरिती पार पडल्या. हॅरिस दुबईतून वेबकॅममार्फत आपला विवाह सोहळा पाहत होते.

वाचा : परिक्षेसाठी तिने लग्नाचा मुहूर्तही लांबवला

आपल्याच लग्नसोहळ्याला नवरदेव उपस्थित राहु शकले नाही म्हणून वधुच्या घरातल्यांनी नाराजी व्यक्त केली. पण हॅरिसच्या घरातल्यांनी मात्र त्याच्याविनाच अगदी धुमधडाक्यात हा विवाह सोहळा पार पाडला. गावक-यांच्या दृष्टींने अजब गजब असणा-या या विवाह सोहळ्याला अनेकांनी उपस्थिती लावली होती.