सेल्फीची क्रेझ तरूणांमध्ये अशी काही आहे की एक सेल्फी घेण्यासाठी ते काहीही करतील. अगदी स्वत:चा जीव देखील धोक्यात घालायला मागे पुढे बघणार नाही. या सेल्फीच्या मोहापायी कित्येक जीव गेलेत. सेल्फी घेण्यात काही गैर नाही पण तो कधी, कुठे घ्यायला पाहिजे हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. पण लोक या साध्या साध्या गोष्टींचाही विचार करणं सोडून देतात. लॉस एंजलिसमध्ये एका तरूणीच्या सेल्फीवेडापायी एका कलाकाराचं १ कोटी २८ लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालं.

वाचा : सरकारी कार्यालयातील कर्मचारी करतात ८ तास हेल्मेट घालून काम

सध्या लॉस एंजलिसमध्ये 14th Factory Exhibition प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी जमली होती. यात तरुणीदेखील होती. प्रदर्शनासाठी ठेवलेल्या कलाकृतींसोबत फोटो काढण्यासाठी तिचा खटाटोप सुरू होता. तिथेच ठेवण्यात आलेल्या कलाकृती शेजारी ती गुडघ्यावर बसली. पण उठताना तिचा तोल गेला आणि मांडून ठेवलेली ठोकळ्यांची रचना काही सेकंदात कोलमडून पडली. सेल्फी काढण्याच्या नादात या तरुणीने काही सेकंदात कलाकाराचं १ कोटी २८ लाख ७० हजांराहून अधिक रुपयांचं नुकसान केलं. कलाकाराने ३० तास मेहनत घेऊन ही कलाकृती उभारली होती पण तरूणींच्या सेल्फी काढण्याच्या मोहामुळे मात्र या कलाकाराच्या कलाकृतीचं मोठं नुकसान झालं.

Viral Video : एका मुलीच्या गुगलीवर उमर अकमल क्लीन बोल्ड!