बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला भोंदूबाबा राम रहिम याची मुलगी हनीप्रीत फरार असून पोलीस सध्या तिच्या मागावर आहे. हरयाणा पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी हनीप्रीतला देश सोडून जाण्याची बंदी घालण्यासाठी नोटीस काढली होती. तेव्हापासून हनीप्रीत फरार आहे. हनीप्रीत ही राम रहिमची दत्तक मुलगी असल्याचे सांगितले जाते. गळ्यात ‘पापा की परी’ असं लॉकेट घालून मिरवणारी हनीप्रीत नेमकी आहे तरी कोण? तिचा भूतकाळ काय? याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलाय. तर या हनीप्रीतचं खरं नाव आहे प्रियंका तनेजा.

हरयाणामधल्या जगजीवन पुरामध्ये २१ जुलै १९८० साली तिचा जन्म झाला. ‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार तिचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. तिचे वडिल रामानंद तनेजा व्यावसायिक होते. फतेहबादमध्ये एका छोट्याशा घरात हे कुटुंब भाड्याने राहत होते. व्यवसायात जम बसल्यानंतर तनेजा कुटुंबानं स्वत:चं घर खरेदी केलं. तनेजा कुटुंब हे फतेहबादमधलं प्रतिष्ठित कुटुंब होतं. १७ वर्षांपूर्वी तनेजा कुटुंबाने फतेहबाद सोडलं. त्यानंतर हे कुटुंब डेरामध्ये राहू लागलं. पुढे या कुटुंबाचं काय झालं याची कल्पना कोणालाही नाही. त्यानंतर कोणीही या कुटुंबाला पाहिलं नाही.

supriya sule file nomination
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

हनीप्रीतचं लग्न विश्वास गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. मात्र, हुंड्यासाठी नवरा छळ करतो असा आरोप हनीप्रीतनं करून पोलिसात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, राम रहिममुळेच आमच्यात दुरावा निर्माण झाला, असं विश्वास गुप्ताचं म्हणणं होतं. या घटनेनंतर हनिप्रीत डेरामध्ये राहू लागली. २००९ मध्ये तिला राम रहिमने दत्तक घेतलं. सध्या हनीप्रीतचा शोध पोलीस घेत आहे. हनीप्रीत सीमा ओलांडून नेपाळमध्ये पळून गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. इतर राज्यांच्या पोलिसांची मदत घेऊन तिचा पोलीस शोध घेत आहे.