स्मशानभूमी जिथे फक्त आणि फक्त आक्रोश ऐकू येतो अशा ठिकाणाहून सनई चौघड्यांचे आवाज ऐकू आले तर? अहो ही भयपटातली कथा वगैरे तुम्हाला सांगत नाहीये. असं खरंच घडलंय, तेही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये. पण स्मशानभूमीतून सनई चौघड्यांचे आवाज येण्याचं कारण मात्र वेगळं होतं. या स्मशानभूमीमध्ये चक्क लग्नसोहळा पार पडला.

आता लग्न म्हटलं की सारं काही पवित्र वातावरण असतं, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लग्नमंडपात आयुष्यभरासाठीच्या गाठी बांधल्या जातात. तर स्मशान म्हटलं की भयाण जागा, जळणारी चिता, आक्रोश असं चित्र असतं. अशा जागी एखादं पवित्र कार्य करण्याचा कोण स्वप्नातही विचार करणार नाही. पण छाया आणि अंकुशने मात्र याच ठिकाणी उभारलेल्या लग्नमंडपात आपली लग्नगाठ बांधली. स्मशानभूमी म्हटली की अंधश्रद्धा आल्याच पण नांदेड जिल्ह्यातील घनसरवाडकर आणि गंधेवाड या गरीब कुटुंबीयांने आपल्या मुलांचे मंगलकार्य स्मशानभूमीत करून एकप्रकारे अंधश्रद्धेची ‘चिता’ रचली. प्रसन्नदाता गणेश ट्रस्टने छायाचं कन्यादानही केलं.

जिथे लोक आक्रोश करत येतात, एरव्ही ज्या रस्त्याने फिरकायलाही कोण तयार होत नाही, त्याच स्मशानभूमीत या नववधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी गावतल्या थोरा मोठ्यांपासून सगळीच मंडळी जमली होती. तेव्हा या अनोख्या लग्नाच्या गोष्टीची साऱ्या गावभर चर्चा होत आहे.

Viral Video : भक्ष्य समजून सापाने गिळली प्लॅस्टिकची बाटली