तुमचा मुलगा फार काळ जिवंत राहू शकत नाही डॉक्टरांनी १७ वर्षांच्या कुमार मारेवाडाच्या कुटुंबियांना सांगितले. हातचा मुलगा असा डोळ्यादेखत मृत्यूशय्येवर झोपला होता, त्याला काही वेळातच अग्नी देण्यात येणार होता आणि तोच चमत्कार झाला आणि हा मुलगा चक्क जीवंत झाला, काल्पनिक किंवा एखाद्या चित्रपटातला हा प्रसंग वाटत असला तरी असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे तो धारवाडीमधल्या मनागुंडी भागात.

कुमारला दोन महिन्यापूर्वी कुत्रा चावला होता. याचा संसर्ग त्याच्या शरीरात संपूर्ण पसरला होता. त्याच्या प्रकृतीत कोणत्याही सुधारणा होत नव्हत्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती, म्हणून कुमारला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जर व्हेंटिलेटर काढले तर पुढचे २० मिनिटेही तो जगू शकणार नाही असेही डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना कळवले.

वाचा : फक्त १८ महिन्यात ‘तिने’ १९६ देश घातले पालथे

त्यामुळे आपला मुलगा काही मिनिटांचा सोबती असल्याचे त्यांनी नातेवाईकांनाही कळवले. गावकरी आणि नातेवाईकांनी  मुलाच्या अंत्ययात्रेचीही तयारी केली. काळी काळासाठी त्याचा मृत्यू झाला असेच सगळ्यांना वाटले. पण स्मशानभूमीपासून काही दूर अंतरावर मृत पावलेला कुमार पुन्हा जागा झाला. त्याला उलट्या सुरू झाल्या त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती बंगळुरू मिररने दिली आहे. या मुलाला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती अजूनही गंभीरच आहे.

वाचा : ८० टक्के भारतीय कर्मचारी बॉसपेक्षा जास्त काम करतात