पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत ज्या अद्भुत रहस्यांनी भरलेल्या आहेत. निर्सगासारख्या किमयागाराने अशी काही त्या जागेवर जादू केली असते की पाहताना आपण थक्क होऊन जातो. जगात अशी अनेक नैसर्गिक आश्चर्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंटार्टिकामधील ब्लड वॉटरफॉल म्हणजेच रक्ताचा धबधबा होय. या धबधब्याकडे पाहिले की जणू वरून रक्ताचे पाट वाहत आहेत असेच कोणालाही वाटेल. पण, या जागेचे रहस्य मात्र काही वेगळे आहे.

VIDEO : दोन कासवांचा वर्चस्वासाठी संघर्ष

अंटार्टिकाच्या व्हिक्टोरिया लँडवर टेलर ही हिमनदी आहे. ती उतराच्या दिशेने खाली येताना तिचे  पाणी रक्तबंबाळ झालेले दिसते. जणू हजारो लोकांचे रक्त या नदीत मिसळले असल्याचे भासते. सगळीकडे शुभ्र बर्फ आणि धबधब्याकडच्या भागातील पाणी तेवढे लाल दिसते, त्यामुळे हे दृश्य पहिल्यांदा कोणी पाहिले तर इथे रक्तपात झाला असेच वाटेल. पण येथे कोणताही रक्तपात झाली नसून रासायनिक प्रक्रियेमुळे यातले पाणी लाल दिसते. या भागात समुद्रातील पाण्यापेक्षा अधिक पटीने क्षार असलेले तलाव आहेत. जेव्हा मोठ्या प्रमाणात लोह असलेले पाणी हवेच्या संर्पकात येते तेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊन गंजासारखे लाल डाग हे बर्फावर पडतात. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे हा धबधबा लाल दिसतो.

वाचा : ‘मी हनुमान आणि मोदी श्रीराम’, हनुमानाच्या रुपात मोदी भक्त पोहोचला रॅलीत