दोन जीवांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे लग्न. पण या लग्नात विघ्न आले तर काय परिस्थिती निर्माण होईल, याचे दर्शन देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्याकडे विवाहसमारंभ जसा थाटामाटात पार पडतो, अगदी तसाच उत्साह आपल्या शेजारील चीनमध्येही पहायला मिळतो. व्हायरल होणारा हा व्हिडिओ चीनमधील एका लग्नातील आहे. या लग्नात नववधूवर आलेला प्रसंग आणि त्यानंतर तिच्या पतीने केलेला उद्योग सध्या नेटीझन्सच्या चर्चेचा विषय बनत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे विघ्न आपल्या लग्नातील फोटो काढताना येणार नाही, असा विचार लग्न न झालेल्याच्या मनात नक्की येईल. तर लग्नातील हा प्रकार आपल्याबाबत घडला असता तर काय झाले असते. असा विचार लग्न झालेल्याच्या मनात येऊ शकतो.

चीनमधील एका विवाह समारंभातील व्हिडिओमध्ये नववधू आपल्या पतीचा हात हातात घेऊन एका बीमवरुन चालताना दिसत आहे. अर्थातच हा सर्व प्रकार हा लग्नातील आठवणी फोटोच्या रुपाने कायम राहाव्या यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. पण हटके फोटोशूट करत असताना अचानकपणे नववधूचा पाय घसरतो आणि ती चक्क खाली पडते. या प्रकारानंतर नववधून वेदनांनी त्रस्त झाल्याचे व्हिडिओत दिसते आहे. आपल्या नव वधूचा होणारा त्रास पाहून पती तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण वेदनांचा आणि या घटनेचा सर्व राग ही नववधून आपल्या पतीवर काढते. त्याला चक्क मारहाण करते. त्यांच्यातील हा प्रकार इथेच थांबत नाही. नववधूनच्या दु:खाने तिचा पती इतका निराश होतो की, तिला झालेल्या त्रासाबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी तो स्वत:ला दुखापत करुन घेतो.
डेली स्टार यूकेच्या वृत्तानुसार ही घटना चीनमध्ये घडली आहे. पत्नीच्या वेदना पाहून संतप्त भावनेने आपल्याला दुखापत करुन घेणाऱ्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय बनत आहे.