गेल्याचवर्षी जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते. यातल्या बोल्ट नावाच्या पेंग्विनचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसासाठी खास ‘फिश अँड आईस केक’ आणण्यात आलाय. बोल्टच्या आवडत्या माशांपासून हा केक तयार करण्यात आलाय. तसेच बोल्टचा वाढदिवस अधिक स्पेशल व्हावा यासाठी हँड प्रिंट केलेलं लाल रंगाचं टीशर्ट देखील तयार करण्यात आलंय. हे लाल रंगाचं टीशर्ट घालून बोल्ट फारच गोड दिसत होता.

Video : शस्त्रक्रियेदरम्यान ‘तो’ वाजवत होता गिटार

बांगडे, बोंबिल, मांदेली या बोल्टच्या आवडत्या माशांपासून हा केक तयार करण्यात आलाय. हम्बोल्ट पेंग्विन कक्षात सध्या सात पेंग्विन आहेत. डोनाल्ड, डेझी, ऑलिव्ह,पॉपाया, मिस्टर मोईट, फ्लिपर, बोल्ट अशी या पेंग्विनची नावं आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये यातल्या एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. सध्या पेंग्विन कक्षात डोनाल्ड-डेझी, ऑलिव्ह-पॉपॉय, मिस्टर मोईट-फ्लिपर या तीन जोडय़ा तयार झाल्या आहेत. यातली ‘मिस्टर मोईट’ आणि ‘फ्लिपर’ ही पेंग्विनची जोडी लवकरच मुंबईकरांना आनंदाची बातमी देणार आहे. फ्लिपर ही मादी लवकरच आई होणार आहे तेव्हा या कक्षात पुन्हा एकदा मुंबईकरांना आठ पेंग्विन पाहता येणार आहे. जुलै २०१६ मध्ये दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते. परंतु या परदेशी पाहुण्यांना येथे आणल्यानंतर तीन महिन्यांतच त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. मार्च महिन्यांपासून सामान्यासाठी पेंग्विन दर्शन खुलं करण्यात आलं होतं.

जाणून घ्या ‘राष्ट्रपती भवना’बद्दल काही रंजक गोष्टी