सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. एखादी संकल्पना फार हटके असली की नेटकरी तिला उचलून धरतात, असंच काहीसं झालं ते या फोटोबाबात. सोशल मीडियावर जोडप्याचा हा फोटो भलताच व्हायरल होत आहे, याला कारणही तसंच आहे म्हणा.

प्रथमदर्शी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांचा हा फोटो दिसत असला तरी तो फोटो पूर्ण पाहिल्यानंतर अनेकजण काहीसे बुचकाळ्यात पडले. अँडी या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेल्या या फोटोला ४८ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. ‘माझी प्रेयसी मिथुन राशीची असली तरी मला ती खूप आवडते असं ट्विट करत अँडीने मिरर सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला आहे.’ पण हा फोटो नीट पाहिल्यावर लक्षात येईल की आरश्यात या दोघांचा चेहरा दिसत असला तरी प्रतिबिंबात मात्र त्याच्या प्रेयसीचे दोन चेहरे दिसतात. या सेल्फीमुळे अनेकजण चक्रावून गेले. नंतर मात्र अनेकांना या फोटोचा अर्थ समजला.

वाचा : जाणून घ्या #MeToo हॅशटॅग का होतोय ट्रेंड

मिथून राशींच्या लोकांना अनेकदा ‘two-faced’ म्हणून चिडवले जाते. या राशींच्या लोकांचा एक वेगळा चेहरा असतो किंवा त्यांच्या वेगळा स्वभाव असतो ज्यापासून संपूर्ण जग अनभिज्ञ असतं आणि नेमकं हेच अँडीला दाखवून द्यायचं होतं म्हणून त्याने कलात्मकरित्या फोटो मॉर्फिंग केलं. अँडीची कल्पना लोकांना खूपच आवडली आहे म्हणूनच त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : अन् कोहलीला मैदानातच भांगडा करण्याचा मोह अनावर