केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, नोएडा येथील रक्षा गोपाळ हिने ९९.६ टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्रिवेंद्रम येथील अजय राज हा विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आला आहे. या मुलांच्या यशाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण या सगळ्या मुलांमध्ये एका विद्यार्थ्याला दुर्लक्षित करून चालणार. गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत त्याने १२ वीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे या विद्यार्थ्यांचं नाव आहे तुषार ऋषी. त्याला एकूण ९५ टक्के गुण मिळाले आहे.

Viral Video : ऐकावे ते नवलच! जन्मत:च बाळ चालू लागले

दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत असलेल्या तुषारला २०१४ मध्ये कॅन्सर झाला. दहावीची परीक्षा अगदी तोंडावर असताना त्याला हाडांचा कॅन्सर झाल्याचे समोर आले. या एका घटनेने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एकीकडे करिअरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं वर्ष तर दुसरीकडे कॅन्सरशी लढा अशी दुहेरी अवस्था त्याची होती. उपचारांसाराठी अनेकदा रुग्णालयात जावे लागायचे. एवढ्या कमी वयात आयुष्यात अशी घटना घडल्यावर कोणीही खचून गेलं असतं पण तुषारने मात्र आपल्या अभ्यासवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर तुषारने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानं सगळेच आश्चर्यचकीत झाले. दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे अशी की कोणत्याही शिकवणीला न जाता त्याने घरच्या घरी अभ्यास करून यश संपादन केलं.

Viral Video : पान खाये हाथी हमारो!

तुषारला इंग्रजीत ९५, भौतिकशास्त्रात ९५ , गणितात ९३ तर कॅम्प्युटरमध्ये ८९ गुण मिळालेत असं ‘हिंदुस्थान टाइम्स’ने म्हटलंय. तुषारच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहेत. तीन महिन्यातून एकदा उपचारांसाठी त्याला रुग्णालायत जावं लागतं, पण या साऱ्या गोष्टीवर मात करून त्यानं यश मिळवलंय. या साऱ्या संघर्षावर तुषारने ‘द पेशंट पेशंट’ नावाचं एक पुस्तकही लिहिलंय.