रस्त्यावर गाडी चालवताना काही नियम पाळणं गरजेचं असतं, हे नियम पाळले नाही तर इच्छित स्थळी पोहोचण्याऐवजी तुम्ही कधी मृत्यूच्या दाढेत पोहोचाल हे सांगता येत नाही. अशीच साखळी अपघाताची मालिका कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पाहायला मिळाली. केवळ समोर धावणाऱ्या गाडीच्या चालकावर सूड उगवण्यासाठी केलेल्या कृत्यामुळे  कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर विचित्र अपघातांची साखळी पाहायला मिळाली.

वाचा : बुमराहसारखी ‘लक्ष्मणरेखा’ ओलांडू नका; वाहतूक पोलिसांची ‘आयडियाची कल्पना’!

कारचालकावर सूड उगवण्यासाठी एका मोटारसायकलस्वाराने त्या गाडीवर लाथ मारून चालकाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि यात तो सफलही झाला. कार चालकाचा आपल्या गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी शेजारून जाणाऱ्या गाडीवर धडकली. दुचाकीस्वाराच्या एका चुकीमुळे महामार्गावर काही सेकंदात अपघातांची मालिका सुरू झाली. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुर्दैवाने या अपघाताच्या वेळी इतर चालकांनी अपघातग्रस्तांना मदत न करता केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे.