अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासूनच शोक व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूनमध्ये अनेक दुकाने बंद करण्यात आली. अशातच तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या रिलेट दारूविक्रेता केंद्राने तीन दिवस राज्यातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे, पुढचे तीन दिवस दारूची सोय करण्यासाठी नागरिकांनी दुकानाच्या बाहेर चक्क लांबलचक रांगा लावल्या आहेत. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वाचा : तामिळनाडू बंद असले तरी ‘अम्मा उपहारगृह’ सुरू

सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे रुग्णालयाने म्हटले होते. जयललिता यांच्या समर्थकांनी रविवारी रात्रीपासूनच अपोलो रुग्णालयाच्या बाहेर गर्दी करायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून तामिळनाडूनत सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. अशातच तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनने देखील परिपत्रक काढत ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी आपली दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे हे तीन दिवस तामिळनाडूत ‘ड्राय डे’ आहे. मात्र TSMC च्या परिपत्रकानंतर दारू घेण्यासाठी अनेकांनी दारूच्या रिटेल शॉपबाहेर लांबलचक रांगा लावल्या.

Viral : एटीएमपेक्षा जास्त गर्दी ‘या’ दुकानासमोर

vasudevan_k या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुढचे तीन दिवस दारूची सोय करण्यासाठी लोकांनी लांबलचक रांगा लावल्याचे यात दिसत आहे. त्यामुळे दारुच्या आहारी लोक किती गेले आहेत याची भयाण वास्तविकता पुन्हा एकदा समोर आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केरळमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. एका बाजूला एटीएम आणि एका बाजूला दारूचे दुकान होते. पण सगळ्यात जास्त रांग ही पैशांसाठी नसून दारूसाठी लावली होती. विरोधाभासाचा तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.