गाव हागणदारी मुक्त व्हावीत यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत गावोगावी शौचालये बांधून दिली जात आहे. पण या शौचालयाचा उपयोग मात्र वेगळ्याच कारणांसाठी होत असल्याचा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. या गावक-यांनी शौचालयात स्वयंपाक घर थाटलंय तर कोणी याचे दुकान बनवले आहे.

मध्य प्रदेशमधल्या छत्तरपूर गावात शौचालये बांधण्यात आली आहे. पण हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या गावातील एकाने या शौचालयचा वापर स्वयंपाक घर म्हणून करायला सुरूवात केली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत या गावातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी निधी देण्यात आला. हा निधी सरपंचांना देण्यात आला. त्यानुसार गावात शौचालयेही बांधण्यात आली पण या शौचालयांचे काम मात्र अर्धवट करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

वाचा : ‘रेल्वे केटरिंग घोटाळ्या’ची पोस्ट फेसबुकवर व्हायरल

वाचा : “माझ्या पोरीने तिचा बाबा दिला देशासाठी”

वाचा : उकळत्या तेलात ‘तो’ चक्क हातांनी तळतो भजी

काही शौचालय अत्यंत छोटी आहेत तर अनेकांमध्ये सेप्टीक टँकही बसवला गेला नाही. त्यामुळे गावक-यांना याचा उपयोग काहीच नाही. या गावातील दिनेश यादव याने तर या शौचालयाचे स्वयंपाक घर बनवले तर लक्ष्मण खुशवाहा यांनी शौचालयात आपले दुकान थाटले. हे संपूर्ण प्रकरण जेव्हा छत्तरपूर जिल्हा पंचायतीकडे पोहोचले तेव्हा या प्रकरणात अधिक लक्ष घालण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.