लहानपणी आपण थोडेसे वैतागलो की आई बाबा किंवा अगदी आजीही आपल्याला एखादे कोडे सोडवायला द्यायचे आणि मग आपले पुढचे कित्येक तास हे कोडं सोडविण्यात जायचा. मग कधी हे कोडं अर्धवट सुटायचं आणि मग डोक्याला ताण देता देता आपण कंटाळून जायचो. मात्र यांचे नेमकं उत्तर काय आहे, आपलं उत्तर बरोबर आहे की नाही याची उत्सुकता असायचीच.

आता सोशल मीडियाने आपल्या आयुष्याचा बराचसा भाग व्यापलेला असल्याने आता ही कोडी सोशल मीडियावर येतात. मग अभ्यास किंवा काम सोडून आपला बराचसा वेळ ही कोडी सोडविण्यात जातो. असेच एक कोडे नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चित्रात एक मोठा त्रिकोण दिलेला असून त्यामध्ये असणारे लहान लहान त्रिकोण ओळखायचे आहेत. तुम्हाला वाटेल आम्हीही याचं उत्तर लगेच तुमच्यासमोर ठेवणार आहोत. मात्र नाही हे उत्तर तुम्हालाच शोधायचंय. पाहा तुम्हाला येतात का हे त्रिकोण ओळखता? तुमची वेळ सुरु होतीये आता…

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

काय मग उत्तर नाही ना सापडलं? फार टेन्शन घेऊ नका नेहमीप्रमाणे उत्तर आम्ही दिलंय. तर या चित्रात एकूण २५ त्रिकोण दडले आहेत. आता तुम्ही म्हणाल इथे तर चोवीसच दिसत आहेत मग २५ कुठून आले? आता ९९ टक्के उत्तर आम्ही दिलंय आता शेवटचा त्रिकोण मात्र तुम्हाला शोधावां लागेल बघूया जमतंय का