उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊनच्या सावत्र भावाची गेल्याच आठवड्यात मलेशियामध्ये हत्या करण्यात आली. मलेशियामधील क्वालालांपूर विमानतळावर किम जाँग नाम यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. आता विमानतळावरील काही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

जपानच्या एका वृत्तवाहिनेच्या बातमीनुसार विष असलेला रुमालाने नाम यांचे तोंड दाबण्यात आले. क्वालालांपूर येथून मकाऊला जाण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर रांगेत उभे होते त्यावेळी एका महिलेने त्यांच्यावर विषप्रयोग केला. या हत्येच्या कटात चार संशयित असल्याचे मलेशियन पोलिसांचे म्हणणे आहे. यात एक व्हिएतनामी, एक इंडोनेशियन महिला तर एक मलेशियन पुरुष आणि उत्तर कोरियाचा संयशियत असल्याचे समजत आहे.

वाचा : फक्त १८ महिन्यात ‘तिने’ १९६ देश घातले पालथे

वाचा : रोजगार हिसकावून घेणा-या रोबोटवर टॅक्स लावला पाहिजे- बिल गेट्स

क्वालालांपूर विमानतळावरील हत्येचे काही सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पांढ-या रंगाचा टॉप घातलेली एक महिला मागून येऊन रुमालाने त्याचे तोंड दाबते आणि निघून जाते. त्यानंतर या फुटेजमध्ये आणखी एक महिला देखील त्याच दिशेने धावत जात असल्याचे दिसत आहे. पण हत्येच्या कटात ती सहभागी होती का याचा तपास पोलीस करत आहे. ज्या दिवशी किम जाँग नामची हत्या झाली त्याचदिवशी काही जण क्वालालांपूरमधून उत्तर कोरियात गेले होते. परंतु पोलिसांना मात्र त्याची माहिती देण्यास नकार दिला आहे. या हत्येमुळे उत्तर कोरिया आणि मलेशियाचे संबध बिघडू शकतात. किम जाँग नाम आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन हे दोघेही सावत्र भाऊ आहेत. २००१ मध्ये किम जाँग नामला जपानमधल्या एका विमानतळावर अटक करण्यात आली होती. किम जाँग नाम बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवास करताना त्याला अटक करण्यात आली होती. हाँगकाँग, मकाऊ आणि चीन या देशांमध्ये जाँग नाम नियमीत प्रवास करायचा असे सूत्रांनी सांगितले.

वाचा : हे कुटुंब खरोखर राहत होतं ‘काळाच्या ४० वर्ष मागे’