काहीवेळा आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पडते. एखादी छोटीशी घटना देखील माणसात असणाऱ्या देवाला सैतान आणि सैतानाला देव बनवू शकते आणि याचच उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेली ‘द लास्ट मिनिट’ ही मल्ल्याळम शॉर्ट फिल्म.

या फिल्मची सुरूवात होते ती आजूबाजूला घडत असलेल्या नेहमीच्याच एका छोट्या घटनेपासून. प्रवाशांनी त्यातूनही पुरुषांनी खचाखच भरलेली बस स्टॉपवर थांबते आणि या बसमध्ये इतर प्रवाशांसोबत चढते एक गर्भवती महिला. चेहऱ्यावर केविलवाणे भाव, आजूबाजूला भिरभिरणारी तिची नजर बसायला कुठे जागा मिळते आहे का हे पाहण्याचा शोध घेते . आपापल्या आसनावर बसलेला प्रत्येक पुरुष त्या उभ्या असलेल्या गर्भवती महिलेला पाहतो. पण एकही उठून आपली जागा तिला देऊ करत नाही. ती प्रत्येक पुरूषाकडे आशेने पाहते. त्यातला एखादा तरी मला बसायला जागा देईल असं तिला वाटतं पण सारे जण नजरा चोरून घेतात. शेवटी हताश झालेली ती गर्भवती महिला तशीच दरवाज्यात उभी राहते. बस काही अंतर दूर जाते. तिच्याच शेजारच्या आसनावर बसलेल्या एका माणसाला तिची दया येते. तो उठतो आणि तिला बसायला जागा देतो.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Student locked himself in room friends immediately called police
VIDEO: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं २ तास दार उघडलं नाही; मित्रांनी बोलवले पोलीस अन्..शेवट पाहून व्हाल लोटपोट
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

इथेच काहीसं वेगळं वळण येतं. जो माणूस त्या महिलेला आपले आसन देतो तो पायाने अपंग असतो. पण तरीही माणुसकीसाठी तो उठतो. ते पाहून अनेकांची मान  शरमेने खाली जाते पण तरीही आपले आसन सोडायला एकही तयार होत नाही. शेवटी एका पायावर आपला तोल सावरत तो कसा बसा दरवाज्यात उभा राहतो. माणुसकी हरवत चाललेल्या या समाजात आपण वावरतो याचे दु:ख दोघांच्याही चेहऱ्यावर साफ दिसते. बसच्या वेगाबरोबर या गर्भवती महिलेच्या मनातील विचारांचाही वेग वाढत जातो. एकीकडे विचार आणि दुसरीकडे दरवाज्यात उभा असलेला आणि माणसुकी दाखवणारा तो अपंग असा संघर्ष तिच्या मनात सुरू असतो. शेवटी मन घट्ट करून चालत्या बसमधून ती दरवाज्यात उभ्या असलेल्या अपंग व्यक्तीला ढकलून देते.

माणुसकी दाखवणाऱ्या अपंगाला चालत्या बसमधून ही गर्भवती का ढकलून देत हे पाहण्यासाठी तुम्हाला ही शॉर्ट फिल्म शेवटपर्यंत बघावी लागेल. एकाच माणसाची सैतानी वृत्ती आणि त्याच्यात असलेलं देवपण अशी दोन्ही रुपं प्रभावीपणे या फिल्ममध्ये मांडली आहेत. मणी दामोदरम यांचे दिग्दर्शन असलेली ही शॉर्ट फिल्म प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे. तुम्हाला ही शॉर्ट फिल्म पाहून काय वाटतं हे नक्की सांगा.