अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शुक्रवारी अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. ८ नोव्हेंबरला झालेल्या अमेरिकन निवडणुकांमध्ये ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा हिलरी क्लिंटन यांना मात देत विजय मिळवला. ट्रम्प यांचा विजय अमेरिकाच काय पण जगासाठी देखील धक्कादायक आणि अनपेक्षित होता. त्यातून अनेक आक्षेपार्ह विधान करत ट्रम्प यांनी वाद ओढावून घेतला आहे. ते निवडून आल्यानंतर तर ट्रम्प विरोधकांनी आंदोलने केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प हे शुक्रवारी औपचारिकरित्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यातूनच शपथविधीपूर्वी ट्रम्प यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आपण शपथविधीसाठी भाषण लिहित आहोत अशी ओळही त्यांनी फोटोसोबत टाकली. आता याच फोटोवरून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची झाली फजिती, मुलीला सोडून भलत्याच इवांकाला केले टॅग

डोनाल्ड ट्रम्प हे शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष काय बोलतील याची उत्सुकता अमेरिकन जनतेलाच काय पण जगालाही असते. आतापर्यंत आपल्या भाषणांने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी सगळ्यांची मने जिंकली होती. आता डोनाल्ड ट्रम्प काय बोलतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी केलेल्या भाषणांत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतला होता. अशातच ट्रम्प यांनी ट्विटरवर आपण भाषण लिहित असलेला फोटो शेअर केला. त्यावरून जगभरातील सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवली जात आहे. हातात पेपर आणि पेन पकडून लिहिण्याचा अभिनय करणा-या ट्रम्प यांनी नक्की काय लिहिले असेल बरं याचा विचार सगळेच करत आहेत. अशा फोटोंवरून ट्रम्प विरोधकांची विनोदबुद्धी जागी झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांनी आपली विनोदबुद्धी वापरून ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

VIRAL: फाटका कुर्ता घालतो म्हणणाऱ्या राहुल गांधींची सोशल मीडियावर उडवली खिल्ली