अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टिका करण्याची एकही संधी त्यांचे विरोधक सोडत नाही. कामापेक्षा अनेकदा डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वागण्या बोलण्यामुळे ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आणि अमेरिकन नेटिझन्समध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची एव्हाना सर्वांनाच सवय झाली आहे. इतकं ट्रोलिंग सुरु असताना ट्रम्प मात्र नेटिझन्सच्या या ट्रोलिंगकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. पण त्यांनी कितीही दुर्लक्ष केलं तरी त्यांच्या चुकांना विरोध करणं मात्र अमेरिकन जनतेनं थांबवलं नाही.

वाचा : अवतीभोवती अनेक कलाकारांची मांदियाळी; ‘हा’ मुलगा आहे तरी कोण?

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या अनेक राज्यांना हरिकेन इरमाचा फटका बसला. नुकतीच चक्रीवादळाने मोठी हानी झालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ट्रम्प आपल्या ताफ्यासह प्युरटो रिकोला पोहोचले होते. प्युरटो रिकोलाही हरिकेन वादळाचा मोठा फटका बसला. गेल्या ९० वर्षांतलं मोठं वादळ या भागानं अनुभवलं. वादळामुळे येथील १६ जणांचा मृत्यू झाला तर हजारो लोक बेघर झाले. वादळाचा फटका बसलेल्या कुटुंबांना गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्यात येणार होतं, डोनाल्ड ट्रम्पही तिथे उपस्थित होते. पण ट्रम्प यांनी प्रत्येकाच्या हातात वस्तू देण्याऐवजी त्या चक्क हवेत फेकल्या, त्यामुळे त्यांच्या अशा वागण्यावर लोकांनी ट्विट करत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.

Viral : यांचा काही नेम नाही!; जिवंतपणीच मित्राच्या शोकसभेचं आयोजन