कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कावळा हे प्रकरण जपळपास सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांच्या गाडीच्या बोनेटवर कावळा बसला होता. सिद्धरामय्या यांच्या कर्मचा-यांनी या कावळ्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला. पण, कावळा काही हलेना. शेवटी कसे बसे या कावळ्याला उडवण्यात कर्मचा-यांना यश आले. तेव्हा अस्वस्थ झालेल्या सिद्धरामय्या यांनी हा अपशकुन असल्याचे मानत नवीन गाडीच विकत घेतली. आता पुन्हा एकदा कावळ्याने सिद्धरामय्या अस्वस्थ झालेत.

वाचा : ‘वाहने सावकाश चालवा!’ अपघातात गर्भवती पत्नी गमावलेल्या पतीची कळकळीची विनंती

एरव्ही सिद्धरामय्या हे अंधश्रद्धा वगेरे मानत नसल्याच्या चर्चा राजकारणात रंगतात. पण जेव्हा गोष्ट कावळ्याची येते तेव्हा मात्र ते शकून अपशकून मानतात असे म्हणत राजकारणात त्याची खिल्ली उडवली जाते. पण हा कावळा काही त्यांचा पिच्छा सोडवत नाही. केरळमधल्या मंजेश्वर येथील एका कार्यक्रमात सिद्धरामय्या आले होते. हा कार्यक्रम खुल्या मैदानात होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पांढ-या धोतरावर कावळ्याची विष्ठा पडली त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मदतीची विनंती केली. आधीच मुख्यमंत्र्यांना कावळ्याच्या वक्रदृष्टीची किती भिती आहे हे सर्वज्ञात आहे त्यामुळे आमदार मोहिउद्दीन बावा आणि मंगलोर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष के. तेजोमय लगेच त्यांच्या मदतीला पोहचले आणि त्यांच्या धोतरेवरची विष्ठा साफ करू लागले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे सुरक्षारक्षक देखील धावत आले.

Viral : सावधान! मशीनमध्ये गेलेल्या पाचशेच्या नोटेची अशी होतेय दुर्दशा

जून महिन्यात सिद्धरामय्या यांच्या गाडीवर कावळा बसला होता. तेव्हा त्यांनी चक्क नवीन गाडीच खरेदी केली होती. कावळा बसणे हा अपशकून असल्याचे मानत त्यांनी गाडी खरेदी केली होती. या प्रकरणाची खूपच चर्चा झाली होती.