नव्वदच्या दशकातील अनेक कार्टुन्स मालिकांनी प्रत्येक मुलांना भुरळ घातली. यातले अनेक पात्र आजही आपण विसरलो नाहीत. इंटरनेटवर ‘मिकी माऊस’ असो, ‘स्टोन एज’, ‘डोनाल्ड डक’, ‘वीन द पू’, डेक्स्टर’ , ‘जंगल बुक’, ‘एरियल’ यासारख्या अनेक कार्टुनचे फोटो पाहिले की मन बालपणीच्या आठवणीत हरवून जाते. यातली एक प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘डक टेल्स’. ‘ झिंदगी तूफानी है… जहाँ है डकबर्ग. गाडीया, लेझर , हवाई जहाज ये हे डकब्लर’ अशा गाण्याने या मालिकेची सुरुवात व्हायची. आता हा कार्यक्रम २०१७ मध्ये पुन्हा येणार आहे.

वाचा : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी रॉकस्टार घेतो ५०० रुपये

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न

अंकल स्क्रूग सगळ्यात श्रीमंत बदक. या बदकाचे तीन पुतणे लुई, डुई, युई आणि पुतणी यांची ही काहाणी. सोन्याच्या नाण्यांमध्ये पोहणारे अंकल स्क्रूग आणि वेगवेगळे रहस्य सोडवणारे त्यांचे पुतणे अशी ही साहसी गोष्ट होती. पण नंतर डिझ्नेची ही मालिका बंद झाली. पण आजही ९०च्या दशकात जन्मलेल्या मुलांना ती चांगलीच लक्षात आहे. म्हणूनच डिझ्नेने ही मलिका परत आणण्याचे ठरवले आहे. २०१७ मध्ये उन्हाळ्यात ही मालिका पुन्हा दिसणार आहे. डिझ्नेने या मालिकेला ‘डक टेल्‍स रीबूट’ असे नाव दिले आहे.

डिझ्नेने ७ डिसेंबरला या मालिकेचा टिझर ट्रेलर प्रदर्शित केले. तसेच याचा टिझर फोटोही प्रदर्शित केला आहे. ‘डिझ्ने एक्सडी’ या वाहिनीवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. ही बातमी समजताच सोशल मीडियावर याची खूपच चर्चा आहे. त्यामुळे #ducktales वापरून अनेकांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.