मेहनत करण्याची तयारी असेल तर यश दूर नाही. व्यासायिक सुदीप दत्ता यांची यशोगाथा नेमके हेच सांगते. प्रतिदिनी फक्त १५ रुपये कमावणारे सुदीप हे आज कोट्यधीश आहेत. १ हजार ६०० कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहेत.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

सुदीप दत्ता हे व्यवसायिक मुळचे पश्चिम बंगालचे. पश्चिम बंगालच्या दुर्गापुरमध्ये ते राहतात. ते १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. कुटुंबातील सात जणांचे पालनपोषण त्यांना करायचे होते त्यामुळे ते मुंबईत आले. सुदीप यांना शिकायचे होते. शिकून त्यांना इंजिनिअर बनायचे होते. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची सारी स्वप्न घुळीला मिळाली. एका पॅकेजिंग कंपनीत दिवसभर काम करत ते २० जणांसोबत छोट्याशा खोलीत राहत. या कामाचे त्यांना प्रतिमहा ४०० रुपये मिळत. त्यानंतर हे पैसे वाचवण्यासाठी दररोज ४० किलोमीटर चालत जात. पुढे ज्या कंपनीत ते नोकरी करायचे ती कंपनी काही दिवसांत बंद होणार होती. सुदीप यांना ही बातमी समजताच त्यांनी पॅकेजिंग कंपनीमधल्या मालकाशी करार करून पॅकेजिंग युनिट भाड्याने घेतले. यासाठी त्यांनी १६ हजार रुपयांचे कर्ज देखील काढले. पुढे त्यांचा व्यवसाय तेजीत सुरू झाला. त्यांनी या व्यवसायात नफा कमावला आणि आपली कंपनी स्थापन केली. Ess Dee Aluminum Pvt Ltd ही पॅकेजिंग इण्डस्ट्रीमधल्या बड्या कंपनीपैकी एक आहे. ही कंपनी १६०० कोटींची आहे.

वाचा : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी रॉकस्टार घेतो ५०० रुपये