रस्त्यावरून ऐटीत चाललेल्या हत्तीला आतापर्यंत तुम्ही फळं खाताना पाहिलं असेल. तसं भारतातल्या काही शहरांतील गल्ल्यांमध्ये हत्तीचा वावर असतो. आता आपल्याकडे हत्तीला गणेशाचं रुप मानतात. तेव्हा रस्त्यातून गजराजांची स्वारी आली की आपसूकच अनेक दुकानदार फळं, चारा, पाणी त्याला देऊ करतात. एव्हाना हत्तींना पण माणसांचं वागणं इतकं जवळचं झालं असतं की ठरलेल्या फळांच्या दुकानासमोर थांबायचं आणि पोटभर फळं खायची, याची काहींना सवय झालेली असते. त्यामुळे हे चित्र आपल्यासाठी काही नवीन नाही. पण मध्य प्रदेशमधल्या रस्त्यावरून फिरताना तुम्हाला यापेक्षा कदाचित जरा वेगळं चित्रही दिसू शकते. कारण इथे राहणाऱ्या हत्तीला चक्क पान खाण्याचा ‘नाद’ लागलाय. आता पान म्हणजे ‘कलकत्ता पान’, ‘बनारसी पान’, ‘नवरत्न पान’ बरं का!

Viral Video : ऐकावे ते नवलच! जन्मत:च बाळ चालू लागले

ananya panday gets emotional after seeing old pic during ipl
शाहरुख खानची लेक सुहाना अन् अनन्या पांडेचा IPL मधील ‘तो’ जुना फोटो व्हायरल, तुम्ही ओळखलंत का?
titeekshaa tawde and siddharth bodke went to goa
गोव्याचा समुद्रकिनारा, सुंदर व्ह्यू अन्…; तितीक्षा तावडे नवऱ्याबरोबर गेली फिरायला, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष
guru and chandrama will make gajkesari rajyoga in aries know impact on zodiac sign
Gajkesari Rajyog 2024: गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ राशी होतील मालामाल, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल धनलाभ
How did Gautami Patil celebrate Holi See photos and videos
“रंग लागला तुझा…”, होळीला गौतमीने दिले चाहत्यांना सरप्राइज! पांढरी साडी अन् गालावर लावला लाल रंग, मोहक अदा पाहून…

मध्य प्रदेशमधल्या सागर जिल्ह्यात राहणाऱ्या हत्तीला हे पान खाण्याचं व्यसन लागलंय. आता हे व्यसन इतकं झालंय की पानाच्या ठेल्यावर जोपर्यंत पान खात नाही तोपर्यंत गजराजांची स्वारी काही केल्या पुढेच जात नाही. तेव्हा गजराजांची स्वारी येणार म्हटल्यावर हा पानवाला त्याच्या आवडीचं पान तयारच करून ठेवतो. हत्ती सकाळी माहूताबरोबर बाहेर पडला की पानवाल्याकडे येऊन थांबतोच आणि एक दोन नाही चांगली आठ दहा पानं खाऊन तृप्ती झाली की तिथून निघतो. सहा वर्षांपूर्वी हत्तीच्या माहूताने त्याला पहिल्यांदा बाजारात आणलं होतं. त्याला पाहून प्रत्येकाने फळं किंवा भाज्या देऊ केल्या शेवटी माहूत एका पानवाल्याच्या दुकानासमोर येऊन थांबला. त्याने आपल्याकडचं मिठा पान हत्तीला देऊ केलं, त्याला ते पान एवढं आवडलं की काही वेळ तो तिथून निघायलाच तयार नव्हता. तेव्हा पासून आतापर्यंत या ठेल्यावर येऊन जोपर्यंत आठ दहा मिठा पान खात नाही, तोपर्यंत हत्तीची स्वारी काही केल्या पुढे जात नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे पान खाण्यासाठी दररोज तीन किलोमीटर चालत हत्ती या दुकानात येतो. आता आपल्या सारख्यांना हे दृश्य तसं नवीन असेल पण इथल्या लोकांना मात्र हत्तीच्या या ‘व्यसना’ची चांगली सवय झालीये.