महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर विजय मिळवला. भारतीय संघ सामना हरला असला, तरी कोट्यवधी भारतीयांची मनं मात्र भारतीय संघाने जिंकली. एकीकडे महिला संघांचं कौतुक होत असताना भारतीय चाहत्यांनी मोठ्या मनाने इंग्लडच्या संघाचं देखील कौतुक केलं. इंग्लडच्या संघात सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली ती सारा टेलर. आपली खेळी आणि चार्मिंग लूकनं तिने भारतीय क्रिकेटप्रेमींना घायाळ केलं. पण क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर राज्य करणारी सारा मात्र कोणे एके काळी भारतीय संघातील एका खेळाडूवर फिदा होती. या खेळाडूचं नाव आहे रविंद्र जडेजा. आता हे ऐकून पुरुष चाहत्यांच्या हृद्याचे तुकडे तुकडे झाले असतील, पण हे खरंय. साराला रविंद्र जडेजा खूप आवडायचा.

वाचा : जाणून घ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा नेमका इतिहास

इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी तिने ट्विटरवर रविंद्रला डेटसाठीही विचारलं होतं. तिने अनेकदा रविंद्रशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच कशाला तिने त्याला भेटायलाही बोलावले होते पण रविंद्रने मात्र तिच्या एकाही ट्विटचं उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे रविंद्रला भेटण्याचं आणि त्याच्यासोबत डेटला जाण्याचं सारचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. वयाच्या १७ वर्षी साराचा खेळ पाहून तिला महिलांच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आलं होतं. २००६ साली लॉर्ड्सच्या मैदानात साराने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ साली सारा वन-डे सामन्यांमध्ये सर्वात जलद १००० धावा काढणारी महिला खेळाडू ठरली. २०१२ साली सारा टेलरला टी-२० ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं होतं. २०१५ साली पुरुषांच्या संघातून खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनण्याचा मानही सारा टेलरने मिळवला आहे. २०१६ साली तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा परिणाम तिच्या मैदानातल्या कामगिरीवरही झाला होता. पण साराने यातून स्वत:ला सावरलं आणि मैदानात दमदार पुनरागमन केलं.