जगप्रसिद्ध अशा फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरही आता व्हॉट्स अॅप, स्नॅपचॅटसारखे ‘स्टोरी फिचर’ उपलब्ध झाले आहे. फेसबुकवरचे हे नवे फिचर अगदी स्नॅपचॅटसारखेच आहे आणि ‘फेसबुक स्टोरी’ असे या फिचरला नाव देण्यात आले आहे. त्यामुळे स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप पाठपोठ आता लगचेच फेसबुकने हे प्रसिद्ध फिचर आणले आहे. त्यामुळे फेसबुक युजर्स आता अॅपच्या वरच्या बाजूला दिलेल्या आयकॉनमध्ये आपली स्टोरी अर्थातच फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकतात. थोडक्यात काय तर जशी तुम्ही इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर स्टोरी शेअर करत होतात तशीच तुम्ही या अॅपच्या माध्यमातूनही करु शकता.

दुसरं म्हणजे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारखी ही स्टोरी देखील २४ तासांच्या आता डिसअपिअर होणार आहे. अँण्ड्राइड आणि IOS मोबाईवर या अपडेट्स उपलब्ध आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रायव्हसी सेटिंगद्वारे तुम्ही ही स्टोरी ठराविक व्यक्तीपर्यंत देखील शेअर करू शकता. त्यामुळे कोणासोबत आपले फोटो शेअर करायचे किंवा कोण ते फोटो बघू शकतात हे सर्वस्वी तुम्हीच ठरवू शकता. यासाठी फोटो अपलोड करताना बाजूला पर्याय दिलेला आहे. एकतर तुम्ही सर्वांसोबत शेअर करण्याच्या पर्यायावर क्लिक करु शकता किंवा ‘Everyone except’ या पर्यायावर क्लिक करून नको असलेल्या व्यक्तींपासून ही स्टोरी हाइड देखील करता येते. फेसबुकच्या मेसेंजर अॅपवर देखील  स्टोरी शेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

वेगवेगळे स्टिकर्स, टेक्स आणि इतर टुल्स वापरून तुम्ही तुमची स्टोरी अधिक आकर्षक बनवू शकता. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सअॅपने ‘व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर’ आणले होते. या दोन्ही अॅपच्या फिचर्सशी मिळते जुळते हे फिचर होते. पण स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरी सारखे हे फिचर काही हिट ठरले नाही. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियाच याला जास्त मिळाल्या त्यामुळे व्हॉट्सअॅपला आपले जुने स्टेटस परत आणावे लागले. आजसकाळपासूनच अँड्राईड मोबाईलवर ऑटोअॅपडेट होऊन हे नवे फिचर उपलब्ध झाले आहे. फेसबुकचे हे नवे  स्टोरी फिचर युजर्सच्या किती पसंतीस उतरते हे पाहण्यासारखे ठरेल.