जगात सध्या सर्वाधिक कोणती सोशल साईट वापरली जात असेल तर ती फेसबुक आहे. आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल करत असल्याने नेटीझन्सची फेसबुकला मोठी पसंती असल्याचे दिसते. तरुणांबरोबरच सर्वच वयोगटात अगदी कमी कालावधीत स्थान मिळविलेल्या फेसबुकने कायमच आपल्या वापरकर्त्यांना खूश केले आहे. यातच आणखी एक भर पडली असून फेसबुकचा वापर आणखी आनंदाचा होणार आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील कोणत्यातरी अॅचिवमेंटसाठी शुभेचछा दिल्यास ‘अभिनंदन’ या शब्दाला वेगळा इफेक्ट मिळणार आहे. त्यानुसार कमेंटबॉक्समध्ये तुम्ही आपल्या फेसबुकवरील मित्रमैत्रीणींना अभिनंदन केल्यास ते लाल रंगाचे दिसेल. इतकेच नाही तर त्यावर रंगिबेरंगी असे वेगवेगळे आकारही उधळले जाणार आहेत. यामध्ये चांदण्या, त्रिकोण आणि इतर अनेक आकारांचा समावेश असेल. त्यामुळे तुम्ही कोणाची आनंदाची एखादी गोष्ट सेलिब्रेट करत असाल तर फेसबुकव्दारे हे सेलिब्रेशन आणखी आनंदी केले जाणार आहे. तेव्हा कोणीही आपली एखादी अॅचिव्हमेंट फेसबुकव्दारे शेअर केल्यास त्यांना अतिशय वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा मिळणार आहेत.

फेसबुकवर या दहा इमोजींचा सर्वाधिक वापर

त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहात त्यांनाही तुमच्या शुभेच्छांमुळे आपला आनंद सेलिब्रेट करता येणार आहे. फेसबुक कायमच नवनवीन फिचर्स देऊन आपल्या युजर्सना खूश करत असते. सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता हे नव्याने आलेले फिचरही फेसबुक युजर्सना आवडेल यात शंका नाही.