22 August 2017

News Flash

रिक्षाचालकाचा मुलगा झाला आयएएस

वडिलांच्या कष्टाचे केले चीज

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 5:48 PM

जेब खाली हो फिर भी मना करते नहीं देखा
मैने पिता से अमीर इंसान नही देखा

कवी गुलजार यांच्या या ओळींप्रमाणे प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी श्रीमंतच असतो. प्रसंगी जीवाचे रान करुन तो मुलाचे शिक्षण करत असतो. अशा परिस्थितीत मुलाने वाखाणण्याजोगे यश मिळवले तर विशेषच. बनारसमध्ये नुकतेच एका मुलाने असे यश मिळवत आपल्या वडिलांना खऱ्या अर्थाने श्रीमंत केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत यश मिळवत गोविंद जयस्वाल वडिलांच्या यशाचे चीज केले आहे.

कोणतेही यश हे एका रात्रीत मिळत नाही तर त्यासाठी सातत्याने केलेली मेहनतच उपयोगी पडते. या मेहनतीबरोबरच आपले आई-वडील, कुटुंबातील इतर व्यक्ती आणि शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. असेच एक वडील म्हणजे बनारसमधील नारायण जयस्वाल. नारायण यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणे अवघड. मात्र हे करतानाच त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण दिलेय इतकेच नाही तर त्यांच्या या कष्टाचे चीज करत मुलानेही चांगला अभ्यास करुन आयएएसची रॅंक मिळवली.

गोविंदकडे यूपीएससीच्या अभ्यासासाठी पुस्तके नसल्याने त्याने क्लासेस घेत पैसे जमवले. १२ बाय ८ च्या घरात राहताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत गोविंदने मिळवलेले यश खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगेच आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवलेले यश त्याच्याबरोबरच त्याच्या वडिलांसाठी अतिशय मानाचे ठरले आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने वडील आणि मुलाच्या नात्याचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे.

First Published on June 19, 2017 5:47 pm

Web Title: fathers day rickshaw driver made his son ias officer govind jayswal banaras
 1. C
  chetan
  Jun 20, 2017 at 1:51 am
  ओल्ड न्युज आहे हि. दर वर्षी नवीन न्यूज द्या
  Reply
 2. P
  Prithiviraj
  Jun 20, 2017 at 12:19 am
  आपण कधीची बातमी सेट आहेत
  Reply
 3. P
  Prithiviraj
  Jun 20, 2017 at 12:18 am
  हा मुलगा गेल्याच वर्षी पास झाला आहे
  Reply
 4. A
  Anupam Dattatray
  Jun 19, 2017 at 8:32 pm
  आपल्या मुलाला हवी आहे स्टडी रूम , iphone -लॅपटॉप ,TV हॉटेलची खाणे पिणे -महागडे कलासेस, मोटरसायकले,बनारस मधून IAS पास झालेल्या गोविंद कडे ह्या पैकी काही नव्हते होती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती तिचाच अभाव आपल्या मुला मदे आहे ह्या वरील सर्व मनोरंजनच करणाऱ्या वस्तूचा त्याग आपली मुले करतील तो आपल्या साठी सुदीन ठरेल.गोविंद ला बापाचे स्वप्न पूर्ण करण्या बद्दल शुभेच्छा
  Reply