सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतो आहे. याला कारणही तसेच आहे म्हणा, या फोटोमध्ये दडलाय एक विषारी साप आणि हाच साप शोधून दाखवायचा आहे. तसं काम आणि इतर टेन्शनं असतंच पण त्यातून थोडासा विरंगुळा म्हणून अनेक जण पालापाचोळ्यात लपलेल्या सापाला शोधण्याच्या प्रयत्न करत आहेत.
हेलेन या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला. ती सध्या पीएचडी करतेय आणि अजगरांच्या प्रजातीवर अभ्यास करते आहे. अभ्यास करताना तिला पालापाचोळ्यात दडलेला एक साप दिसला. हा साप पालापोचळ्याशी इतका काही एकरूप झाला की कोणालाच तो सहजासहजी दिसू शकत नाही. तेव्हा त्याला शोधून काढण्याचे चॅलेन्ज तिने नेटिझन्सना दिले. आता अनेकांना याचे उत्तर डोकेफोड करूनही मिळाले नाही. तुमचेही असेच झाले आहे का? मग फार टेन्शन घ्यायची गरज नाही याचे उत्तर तसे आधीच शोधून ठेवले आहे.

snake-670
दोन महिन्यापूर्वी असाच एक फोटो व्हायरल झाला होता. प्लेबझवर एक चित्र अपलोड करण्यात आले होता. एका झाडाखाली बदकांचा थवा जमला आहे. याच झाडावर एक कोल्हा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला आहे. या चित्रात कोल्हा कुठे लपून बसला आहे याचे उत्तर एका फटक्यात शोधायचे होते. विशेष म्हणजे ८ पैकी फक्त एकच व्यक्ती हे कोडे सोडवू शकतो असा दावा करण्यात आला होता त्यामुळे तर हे कोडं सोडवण्यासाठी सगळ्यांचा आणखी खटाटोप चालला होता.

VIRAL : आठपैकी फक्त एकच व्यक्ती सोडवू शकतो ‘हे’ कोडे?