पुण्यातील धायरी भागात राहणारे सर्पमित्र अप्पा दुगड यांनी पकडलेल्या घोणस या विषारी जातीच्या सापाने एका रात्रीत तब्ब्ल ६५ पिल्लांना जन्म दिला आहे. या सापाच्या पिलांना पाहण्यासाठी सध्या मोठ्याप्रमाणात नागरिकांनी दुगड यांच्या घरी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते.

पुण्यातील धायरी परिसरात काल दुपारी एका शेतामध्ये साप असल्याची माहिती सर्प मित्र अप्पा दुगड यांना नागरिकांनी दिली. त्यांनतर त्यांनी धायरी येथील शेतामध्ये जाऊन सापाचा शोध घेतला. तो घोणस या जातीतील साप असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी या सापाला पकडून त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांनी या सापाला फिशटॅंक सारख्या काचेच्या भांड्यात ठेवले. त्याच दरम्यान त्यांना या घोणसच्या पोटात पिल्लं असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे विशेष लक्ष देण्यात आले. या घोणसने रविवारी रात्री एक नव्हे दोन नव्हे तर तब्ब्ल ६५ पिल्लांना जन्म दिल्याची घटना घडली. यामुळे त्यांच्या घरातील सर्व आश्चर्य चकित झाले. या पिल्लांना पाहण्यासाठी या परिसरातील एकच गर्दी झाली होती. या घटनेनंतर अप्पा दुगड यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पानशेत येथील जंगलात घोणस आणि ६५ पिलांना सोडून दिले.

two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
Stolen pipe connections to illegal buildings in Dombivli man arrested including plumber
डोंबिवलीत बेकायदा इमारतींना चोरीच्या नळजोडण्या, प्लंबरसह मध्यस्थ अटकेत

घोणस जातीच्या सापाचा आकार कसा आहे, त्यानुसार त्या प्राण्याच्या पिल्लांची किंवा अंड्यांची संख्या ठरते. मात्र साधारण २० ते ४० किंवा जास्तीत जास्त ७० पिल्लांना घोणस एकावेळी जन्म देऊ शकते. अशी माहिती कात्रज प्राणी संग्रहालयाचे पशू वैद्यकीय अधिकारी अंकुश दुबे यांनी म्हटले आहे.