कोष्टी नावाचा किडा हा उंदराला भक्ष्य बनवू शकतो का? असा सवाल तुम्हाला कोणी केला तर तुम्ही सवाल करणाऱ्याची गिरकी नक्कीच घ्याल. कारण कोष्टी हा उंदराची शिकार करणे शक्य नाही असच तुम्हालाही वाटेल. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर कदाचित अशा सवालावर तुम्हा वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हाल. उंदराला भक्ष बनविण्याचा प्रयत्न कोष्टी देखील करु शकतो याच्यावर तुमचा विश्वास बसेलव. व्हिडिओतील कोष्टीला उंदराला भक्ष बनविण्याची इच्छा आहे का? याचे उत्तर शोधणे कठिण आहे. पण इवलूशा कोष्टीची उंदाच्या पिल्लाला ज्या पद्धतीने तोंडामध्ये धरल्याचे दिसते त्यावरुन हा कोष्टी उंदराला भक्ष बनविण्याच्या प्रयत्न करत असल्याचे दिसते.

ऑस्ट्रेलियातील एका फेसबुक युजर्सने हा व्हिडिओ शेअर केला असून सध्या या व्हिडिओला अधिक लोकप्रियता मिळताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये एक मोठा कोष्टी दिसून येतो. हा कोष्टी फ्रिजवर चढत असल्याचे दिसते. त्याच्या तोंडामध्ये उंदराचे पिल्लू असल्याचे दिसते. हा कोष्टी त्याला भक्ष बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. या व्हिडिओला लाखोच्या घरात पसंती मिळत आहे.

जेसॉन नावाच्या फेसबुक युजर्सने २२ आक्टोबरला हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर आतापर्यंत अनेक नेटीझन्स या व्हिडिओला पसंती देऊन शेअर करताना दिसत आहे. जेसॉनने आपल्या शेजारील मित्राला काहीतर वेगळे दाखवितो असे सांगून  कोष्टीचा सुरु असलेला खेळ दाखविला. कोष्टीचा हा खेळ पाहून जेसॉनच्या मित्राने या कोष्टीला आपल्या कॅमेरामध्ये कैद केले. त्यानंतर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल २ कोटी लोकांनी पाहिला आहे. तर २ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच ४८ लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.