सध्या युट्युबवर टाकण्यात आलेली एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारणही तसे गंभीरच आहे. कारण या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी तरूणीने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर तिच्याशी फ्लर्ट करण्याचा आरोप लावला आहे. आपण विमानाने प्रवास करत असताना त्यांनी आपल्या सोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिने केला आहे. पाकिस्तानमधला एका टीव्ही शोमध्ये तिने ही गोष्ट उघडपणे सांगितली. पाकिस्तानमधल्या शो ऑवार द एज या कार्यक्रमात तिने ही गोष्ट सांगितली. या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी ही मुलगी आली होती तेव्हा तुझ्यासोबत कोणी फ्लर्ट केले असा प्रश्न तिला विचारण्यात आला तेव्हा तिने थेट नवाज शरीफ यांचे नाव घेतले. इस्लामाबादला विमानाने प्रवास करत असताना शरीफांनी आपला मोबाईल नंबर मागितला इतकच नाही तर आपल्याला संध्याकाळी काय करते असे देखील विचारले असल्याचे तिने सांगितले. आपल्याला नवाज शरीफ यांनी जेवणासाठीही विचारले असे या मुलीचे म्हणणे आहे. या मुलीचे नाव असमा राजपूत असल्याचे समजते. दरम्यान तिने सांगितलेल्या एकाही गोष्टीवर परिक्षकाने मात्र अविश्वास दर्शवला पण आपल्याकडे नवाज शरीफांसोबत फोटो असल्याचे देखील तिने सांगितले. पण हे आरोप करताना आपल्याला शरीफ यांची फ्लर्ट करण्याची स्टाईल खूपच आवडली अशी कबुलीही अगदी बिंधास्तपणे या तरूणीने दिली. या व्हिडिओला इंटरनेवर हजारो व्ह्यु मिळत आहेत दरम्यान तिने केलेल्या आरोपांच्या खरपुस चर्चा देखील नेटीझीन्समध्ये रंगत आहेत.