आपलंही छान कुटुंब असावं. त्यात मायेचा घास भरवणारी आई असावी, काळजी करणारे बाबा असावेत, चिऊ काऊच्या गोष्टी सांगणारी आजी असावी, खाऊ आणणारे आजोबा असावेत. हक्काने रागवण्यासाठी आणि खेळण्यासाठी भाऊ-बहिण असावेत, असं प्रत्येकाला वाटतं. पण सारेच काही सुदैवी नसतात. काही कमनशिबी मुलंही या जगात असतात ज्यांना मायेचं छत्र, कुटुंबाचं प्रेम कधीच लाभत नाही. ‘सगळ्यांना आई बाबा असतात?’ मग मला का नाही? असा प्रश्न कितीतरी वेळा ही मुलं देवाला विचारतात. त्यांच्यासाठी अनाथ आश्रमातील खोलीच घर असते अन् तिथे राहणारी मुलं कुटुंब.

वाचा : एक वडापाव मदतीसाठी!, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम

सुदैवाने काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचं भविष्य घडवणारे लोकही या जगात आहेत. आई वडील, बहिण-भाऊ, आजी-आजोबा यांचं प्रेम कधीही न अनुभवलेल्या यातल्या काही नशीबवान मुलांना आपल्यालाही कोणीतरी दत्तक घेणार असं समजतं तेव्हा त्यांना किती आनंद होतो हे दाखवणारा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ११ वर्षांची तन्नाह अनाथ आहे. तिला दत्तक घेण्याची तयारी एका कुटुंबाने दाखवली. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आश्रमातल्या महिलेने तिला ही गोष्ट सांगितली तेव्हा तिला इतका आनंद झाला की त्या महिलेला तिने आनंदाने घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आश्रमात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झालं. याचा छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो पाहून एखाद्याच्या पापण्या ओलावल्या नसतील तर नवल!

FIFA U17 : गोलकीपर धीरजच्या पालकांचा फुटबॉल खेळण्यास विरोध होता कारण…

https://www.instagram.com/p/BZw9mQbFgt5/