आज जागतिक वसुंधरा दिवस (अर्थ डे) आहे. प्रदूषण ही जगाला भेडसवणारी सर्वात कोठी समस्या आहे. अति औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढता वापर, बेसुमार वृक्षतोड आदी कारणांमुळे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्याचा वातावरणावरही मोठा परिणाम होत आहे. सर्वच स्तरावर प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असतातच. त्यात आता गुगलनेही डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत नागरिकांना पृथ्वी प्रदूषित न करण्याचा सल्ला दिला आहे. गुगलने डुडलच्या ११ स्लाईड तयार केल्या असून यामध्ये प्रदूषणाविरोधात मोहीम चालवणारा एक कोल्हा दाखवण्यात आला आहे. हा कोल्हा आपल्या स्वप्नात पृथ्वीचे सौंदर्य पाहतो. जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा तो आश्चर्यचकीत होतो. कारण वास्तवात स्वप्नात पाहिल्यापेक्षा सर्व विरूद्ध असतं. प्रदूषणामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा पृथ्वीवर परिणाम होत असल्याचे कोल्ह्याला माहीत असतं. तो पर्यावरणाचा प्रदूषणापासून बचावाचा निर्णय घेतो. तो पर्यावरणाचे संरक्षण आणि पोषणासाठी एक मोहीम सुरू करतो. ही मोहीम राबवताना त्याला मदत करण्यासाठी अनेक मित्र मिळतात. या ११ स्लाईडमध्ये गुगलने कोल्ह्याची गोष्ट दाखवून आपल्याला पृथ्वीचे संरक्षण कसे केले पाहिजे, हे सांगितले आहे.

google-doodle1

google-doodle2

google-doodle3

google-doodle4

google-doodle5

जसे की, इंधन वाचवण्यासाठी कार पुल करणे, वाहनाची गरज नसेल तर चालत गेले पाहिजे, तंदूरूस्त राहण्यासाठी आणि प्रदूषण होऊ नये यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कराव, विजेची गरज नसताना त्याचा वापर करणे टाळा, असे छोटे-छोटे संदेश यातून दिले आहेत.

google-doodle8

google-doodle10

google-doodle11-1

त्याचबरोबर फळे, भाज्या आणि स्थानिक परिस्थितीत पिकवण्यात आलेल्या खाद्य पदार्थांचा वापर केला पाहिजे, हेही डूडलच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर गुगल डुडलने सौर ऊर्जा वापरण्यास प्राधान्य देण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

google-doodle6

google-doodle7

google-doodle9