अनलिमिटेड मोफत इंटरनेट आणि कॉल्सची सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात वरचढ स्थान पटकावलं आहे. तेव्हा आता या ‘जिओ’ नावाची जादू लोकांवर किती आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता या ‘जिओ’च्या लाटेचा वापर एका पाणीपुरीवाल्याने आपला तोट्यात चालणारा व्यवसाय वाचवण्यासाठी केला तर आश्चर्य वाटायला नको. आता ते कसं काय?, असा प्रश्न तुम्हाला पडलायं ना! चला थोडं सोपं करून सांगतो. तर गुजरातमध्ये रवि जगदंबा नावाचा पाणीपुरीवाला आहे, आता आपली पाणीपुरी विकण्यासाठी त्याने एकदम बेस्ट शक्कल लढवली आहे. त्याने आपल्या पाणीपुरीच्या ठेल्याला नाव दिलंय ‘जिओ पाणीपुरी’. दुकानाबाहेर ‘जिओ’ लावलंय म्हटल्यावर जिओसारखी खास सेवाही द्यायला हवीच ना!

तर रविने ‘रिलायन्स जिओ’च्या ऑफरपासून प्रेरणा घेत आपल्या ग्राहकांना एक ऑफर देऊ केलीये. ही ऑफर म्हणजे अशी की शंभर रुपये रविला द्यायचे आणि त्याबदल्यात अनलिमिटेड पाणीपुरी खायची. आहे की नाही भन्नाट ऑफर? पण त्याचबरोबर रविने आणखी एक ऑफर आणलीय ती म्हणजे महिन्याला त्याच्याकडे १००० रुपये भरायचे आणि त्याबदल्यात महिनाभर अनलिमिटेड पाणीपुरी खायची. आता ही ऑफर ऐकल्यावर ग्राहकांनी तिथे गर्दी झाली नाही तर नवलंच. जिओ पाणीपुरीवाल्याची अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर ऐकून सगळ्यांनी रविच्या ठेल्याबाहेर गर्दी करायाला सुरूवातही केली.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Job Opportunity Job Opportunity in Bank of India career
नोकरीची संधी: बँक ऑफ इंडियातील संधी
Job Opportunity Recruitment of Technician Posts career
नोकरीची संधी: टेक्निशियन पदांची भरती
The state government has decided to allow two more companies of generic drugs Mumbai
जेनेरिक औषधांची ‘दुकानदारी’ सुरूच; आणखी दोन कंपन्यांना राज्य सरकारच्या पायघडय़ा