इंटरनेट सर्फिंग स्मार्टफोनवरून करण्यास सध्या अनेक जण प्राधान्य देतात. स्मार्टफोनवरील स्वस्त इंटरनेटमुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा संगणकाऐवजी स्मार्टफोन वापरकर्त्यांकडे वळवला आहे. स्मार्टफोनवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत स्मार्टफोनची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे. स्मार्टफोन क्लिन करण्यासाठीही विविध अॅप्लिकेशनचा वापर करतो. मात्र, अशी अॅप्लिकेशन्स वापरताना काही काळजी घेणे आवश्यक असते. या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातूनच आपला स्मार्टफोन हॅक होण्याची शक्यता असते. यातही काही विशिष्ट अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून अशाप्रकारे हॅकिंग करण्याचे प्रमाण जास्त आहे.

कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी अनेकांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये ‘सी क्लीनर’ हे अॅप किंवा सॉफ्टवेअर असते. मात्र या अॅप आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डेटा चोरला जात असल्याचे समोर आले आहे. सी क्लीनर सॉफ्टवेअरची सिक्युरिटी सिस्टीम मोडून हॅकर्स त्यात मालवेअर इंजेक्ट करतात. यामुळे आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील डेटा चोरणे सहज शक्य होते. आतापर्यंत जवळपास २२ लाख लोकांना याचा धोका पोहोचला आहे. ‘झी ने दिलेल्या वृत्तानुसार, सी क्लीनर व्हर्जन ५.३३ मध्ये मल्टी स्टेज्ड मालवेअर पेलोड असल्यामुळे ते इन्स्टॉल करताच सिस्टममध्ये प्रवेश करतात. जगभरात वापरले जाणारे हे अॅप आतापर्यंत साधारण २ कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. हॅकर्स यामधून संपर्क क्रमांक, सिस्टीमचा आयपी अॅड्रेस, तुम्ही मोबाईल बँकिंग वापरत असाल तर तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती आणि पासवर्ड चोरू शकतात.

आता हॅक करण्यात आलेल्या कॉम्प्युटर सिस्टीममधील जास्त कॉम्प्युटर ३२ बिटचे आहेत. ज्यांच्या सिस्टीममध्ये सी क्लिनरचे ५.३३.६१६२ व्हर्जन आहे त्यांना ही समस्या उद्भवू शकते. असल्यास ही समस्या उद्भवू शकते. मात्र, ज्यांनी आपले सी क्लिनर १२ डिसेंबरनंतर अपडेट केले आहे त्यांची सिस्टीम सुरक्षित असल्याचेही म्हटले आहे.