इंजिनिअरिंगच्या GATE २०१७  परिक्षेचे निकाल लागले आहेत. यात जयपुरच्या २२ वर्षीय विद्यार्थ्यांने १००० पैकी चक्क ९९९ गुण मिळवले. त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंगमधून तो देशातून पहिला आलाय. हर्ष गुप्ता असे या पठ्ठ्याचे नाव. जयपूरच्या मालवीय आयटी कॉलेजमध्ये हर्ष शिकतो. २०१३ मध्ये त्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्या तो बी-टेकला शेवटच्या वर्षांत आहे. या परिक्षेत अभूतपूर्व यश मिळवून तो केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पहिला आहे आहे. अर्थात आता त्याचे एकूण गुण पाहून अनेकांना त्याचे भविष्य उज्वल असणार असे वाटणारच आणि ते असेलही पण आश्चर्य म्हणजे हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत हर्षने मात्र पुढे काय करायचे तेच माहित नसल्याचे सांगून टाकले. एवढे उत्तम गुण मिळवूनही नक्की काय करायचे अशा संभ्रमात सध्या तरी तो आहे. पण आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊनच मग काय ते ठरवू अशी भूमिका त्याने घेतली आहे. हर्षचे वडिल प्राध्यापक आहेत तर भाऊ इंजिनिअर आहे.

वाचा : यंदाचे सर्वात श्रीमंत भारतीय कोण? ओळखायचं कुठलंही बक्षीस नाही!

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

VIDEO: दिव्यांग पत्नीला नवरदेव स्वत: उचलून आणतो तेव्हा….