‘जाते थे जापान, पहुच गए चीन  समझ गए ना …  असं म्हणण्याची वेळ बांगलादेशमधल्या वऱ्हाडी मंडळींवर आली. त्याचं झालं असं की या वऱ्हाडी मंडळींना लग्नमंडपात पोहोचायचं होतं. तेव्हा त्यांच्यासाठी खास चॉपर मागवलं होतं. लग्नाचा थाट मोठा होता त्यातून लग्नमंडपात चॉपरनं एण्ट्री घेणार म्हटल्यावर मंडळीही भारीच खूश  होती.  पण ऐनवेळी मोठा घोळ झाला पायलटला काही इच्छित स्थळ  मिळेना. तेव्हा त्यानं चुकून चॉपर लग्नमंडपाऐवजी तुरुंगाच्या  मैदानात लँड केलं.

काशिमपूर मध्यवर्ती तुरूंगात त्यानं चॉपर लँड केलं.  हे चॉपर बघून तुरूंगातल्या अधिकाऱ्यांना चांगलंच कापरं भरलं. सुरूवातीला  या तुरुंगातल्या कैद्यांना सोडवण्यासाठी दहशतवादी तुरूंगाच्या परिसरात घुसले की काय असंच पोलिसांना वाटलं पण नंतर जेव्हा या चॉपरमधून नटलेली  वऱ्हाडी मंडळी खाली उतरली तेव्हा  मात्र पोलिसांच्या जीवात जीव आला.

वाचा : सोशल मीडियावर चर्चेत असलेलं ‘Sarahah app’ नक्की आहे तरी काय?

पायलटला नेमका रस्ता समजत नव्हता तेव्हा त्यानं  चुकून चॉपर तुरूंगातच लँड केलं. काही दिवसांपूर्वीच या तुरुंगावर दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा  चॉपर लँड झाल्यानं पोलिसांचा पुरता गोंधळ उडाला होता.

वाचा : प्रत्येक गोष्ट फेसबुकवर अपडेट करताय? मग ही बातमी वाचाच!