स्मार्टफोन म्हणजे आपला जीव की प्राण. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या माणसाच्या मुलभूत गरजा तर आहेतच पण आता स्मार्टफोनचा देखील गरजांमध्ये समावेश झाला तर नवल वाटायचे कारण नाही. या स्मार्टफोनच्या वापरातून आपण कित्येक गोष्टी करू शकतो. एकमेकांशी संपर्कात राहण्यापासून ते मोबाईल बँकिंग, ऑफिसची कामे अशा अनेक गोष्टी आपण त्याच्या मदतीने करु शकतो. त्यामुळे हा स्मार्ट फोन सुरक्षित ठेवणेही तितकेच गरजेचे असते. एका अहवालानुसार दिल्ली, मुंबईसारख्या शहरांतील ट्रेनमध्ये दर दिवशी जवळपास ५० हून अधिक स्मार्टफोनची चोरी होते किंवा अनेक सायबर अटॅकमुळे फोनमधील माहिती हॅकरच्या हाती लागते. त्यामुळे, फोन सुरक्षित ठेवणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी काही गोष्टींची खबरदारी नक्की घ्या.

वाचा : ….म्हणून मुली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नाही

स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी करा
* स्मार्टफोन घेतल्यानंतर आर्वजून त्यात अँटीवायरस टाकून घ्या. अनेकदा आपण मोबाईलमध्ये अँटीवायरस सॉफ्टवेअर अपलोड करायला कंटाळ करतो. पण, मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. मोफतही तुम्ही अँटीवायरस डाऊनलोड करून घेऊ शकता.
* कोणतेही अॅप डाऊनलोड करताना ते प्लेस्टोअर किंवा अॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करा. कोणत्याही मेल किंवा बेवसाईटवर असलेल्या अॅपच्या लिंक डाऊनलोड करून नका. मोबाईलमधील डेटा हॅक होण्याची शक्यता अधिक असते.
* मोबाईल फोन नेहमी अपडेट करा. स्मार्टफोनमध्ये नेहमी अपडेटसाठी नोटीफिकेशन येतात. पण मोबाईल अपटेड केल्यावर डेटा पॅक संपेल या भितीने अनेक जण तो अपडेट करण्यासाठी टाळाटाळ करतात. पण, वेळोवेळी मोबाईल अपडेट करून घेणे जास्त फायद्याचे ठरले.
* आपण अनेक ठिकाणी असणा-या मोफत वायफायचा लाभ घेतो. पण कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होणा-या मोफत वायफायचा वापर करणे टाळा.
* अँड्राईडफोनमध्ये ‘अँड्राईड डिवाइस सिक्युरिटी सेटिंग’ असते. ज्यात तुम्ही पीन क्रमांक टाकून तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता किंवा तुम्ही तुमचे अॅप्लिकेशन, डॉक्युमेंट लॉक करुन ठेऊ शकता.